खडक, फरासखाना, स्वारगेट, कोंढवा पोलीस ठाण्यातील भागात कर्फ्यु सुरु; १४ एप्रिलपर्यंत आदेश लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 10:03 AM2020-04-07T10:03:13+5:302020-04-07T10:23:12+5:30

चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मध्यरात्रीपासून पोलिसांनी कर्फ्यु लागू केला असून सर्वांना घरात थांबण्याचे सक्त आदेश दिले आहेत. 

Curfew begins in Khadak, faraskhana, swargate and kondva police station area | खडक, फरासखाना, स्वारगेट, कोंढवा पोलीस ठाण्यातील भागात कर्फ्यु सुरु; १४ एप्रिलपर्यंत आदेश लागू

खडक, फरासखाना, स्वारगेट, कोंढवा पोलीस ठाण्यातील भागात कर्फ्यु सुरु; १४ एप्रिलपर्यंत आदेश लागू

googlenewsNext

पुणे : पुणे शहरातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता जेथे कोरोना बाधित जास्त आढळून आले, त्या शहरातील चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मध्यरात्रीपासून पोलिसांनी कर्फ्यु लागू केला असून सर्वांना घरात थांबण्याचे सक्त आदेश दिले आहेत. 

कर्फ्यु लागू केलेला भाग असा

खडक पोलीस ठाणे : मक्का मस्जिद, यादगार बेकरी ते दलाल चौक, मोहसिन जनरल स्टोअर्स, शमा फॅब्रिकेशन, शहीद भगतसिंग चौक, उल्हास मित्र मंडळ, राजा टॉवर, इम्युनल चर्चची मागील बाजू, हाजी इसाक शेख उद्दीन पथ, पुष्पम ज्वेलर्स, मंगल क्लबजवळ महाराणा प्रताप रोड, मिठगंज पोलीस चौकी, रॉयल केटरर्स समोरील बोळ, जाहीद लेडीज टेलर्स, चाँदतारा चौक, मदिना केटरर्स, घोरपडे पेठ पोलीस चौकी, इकबाल स्क्रॅप सेंटर या ठिकाणांचे आतील परिसर.

फरासखाना पोलीस ठाणे : मंगळवार पेठेतील कागदीपूरा, मंगळवार पेठ १५७, मंगळवार पेठ गाडीतळ चौक, कामगार पुतळा रोड २२०, मंगळवार पेठ २२४, मंगळवार पेठ २२६, मंगळवार पेठ. रविवार पेठ - गोविंद हलवाई चौक, हमजेखान चौक, गुरुद्वारा रोड, देवजीबाबा चौक

स्वारगेट पोलीस ठाणे : मीनाताई ठाकरे वसाहत कमान - महर्षीनगरपासून ते गिरीधर भवन चौकापर्यंतच्या रस्त्याच्या डावीकडील भाग, महावीर प्रतिष्ठानपासून राधास्वामी सत्संग ब्यासकडे जाणार्‍या रस्त्याचे डाव्या बाजूस असलेले सूर्यमुखी गणेश मंदिरपासून पुढे राधास्वामी सत्संग ब्यासपर्यंतची डावीकडील बाजू.

राधास्वामी सत्संग ब्यासपासून डायस प्लॉट चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील डायस प्लॉट चौकापर्यंतचा डाव्या बाजूचा खिलारे वस्ती व पी अ‍ँड टी कॉलनी यांचे सीमा भिंतीपर्यंतचा भाग व राधास्वामी सत्संग ब्यासपासून डायस प्लॉट चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील डायस प्लाँट चौकापर्यंचा उजव्या बाजूचा भाग

डायस प्लॉट चौक ते सेव्हन लव्हज चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील डायस प्लॉटपर्यतचा रस्त्याचा उजवीकडील भाग.
डायस प्लॉट चौकाकडून लक्ष्मी नारायण चौकाकडे (सातारा रोड) जाणार्‍या डायस प्लॉट चौकापासून मीनाताई ठाकरे वसाहत कमानपर्यंतचा डावीकडील भाग.  गिरीधर भवन चौक ते डायस प्लॉट चौक या रस्त्याच्या उजव्या व डाव्या बाजूचा भाग डायस प्लॉट चौक ते राधास्वामी सत्संग ब्यास दरम्यानचा रस्ता 

कोंढवा पोलीस ठाणे : अशोका म्युज सोसायटी, आशिर्वाद चौक, मिठानगर, सत्यानंद हॉस्पिटल गल्ली, भैरोबा मंदिर, पीएमटी बसस्टॉप, संत गाडगे महाराज शाळा, साई मंदिर ब्रम्हा अ‍ॅव्हेन्यू सोसायटी, शालीमार सोसायटी, कुमार पृथ्वी गंगाधाम रोड, मलीकनगर.
या भागात संपूर्ण कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. 

या आदेशातून पोलीस,आरोग्य विभाग, दवाखाना, औषधालये, अत्यवस्थ रुग्णांची वाहतूक, कोरोना प्रतिबंधक उपाय योजना संबंधित मनपा व शासकीय सेवा देणारे अधिकारी कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पोलिसांनी परवानगी दिलेल्या व्यक्तींना लागू नसतील. मात्र, त्यासाठी त्यांचे अधिकृत ओळखपत्र,आवश्यक कागदपत्रे व या विशेष कार्यासाठी नेमणूकीबाबतचे आदेश सोबत बाळगणे बंधनकारक असेल.

कर्फ्यु लागू करण्यात आलेल्या भागातील जीवनाश्यक वस्तू व सेवा याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.   या भागातील कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतूकीने रस्त्यावर, गल्लोगल्ली या ठिकाणी संचार, वाहतूक करणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्याला मनाई करण्यात आली आहे.

Web Title: Curfew begins in Khadak, faraskhana, swargate and kondva police station area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.