शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

लोककलांमधून उलगडली संस्कृती

By admin | Updated: May 5, 2017 02:32 IST

गर्जा महाराष्ट्र माझा, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, अरे कृष्णा, अरे कान्हा, लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी सारख्या

पिंपरी : गर्जा महाराष्ट्र माझा, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, अरे कृष्णा, अरे कान्हा, लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी सारख्या अजरामर गीते आणि लोककलांचा वारसा जपणाऱ्या नयनरम्य नृत्यरचनांच्या सादरीकरणाने महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा रसिकांसमोर उलगडला.सांस्कृतिक कला अकादमी ट्रस्ट, पुणेतर्फे ‘संस्कृती महाराष्ट्राची ; वैभवशाली परंपरेची’हा गायन, वादन आणि नृत्याचा अनोखा कलाविष्कार चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सादर झाला. संगीतकार कौशल इनामदार, सिनेकलाकार पार्थ भालेराव, माजी महापौर अपर्णा डोके, चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदारमहाराज देव, सामाजिक कार्यकर्ते आनंद कुदळे, नीता गुरव, धनश्री कुलकर्णी, चंद्रकांत निगडे, शरद महाबळ, विश्वनाथ भालेराव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या गर्जा महाराष्ट्र माझा या बहारदार गीताने झाली. तर संतांनी आपल्या आराध्याला हाक मारण्याकरिता निवडलेल्या अरे संसार संसार या ओवीच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अगं नाच नाच राधे... ही गवळणी सादर झाली. गवळणी आणि लावण्या यांच्या मेलडीने रंगत आणली. शाहिरी परंपरेतील श्रीकांत रेणके यांनी शिवरायांचे गुणगान पोवाड्यातून सादर केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेले तांबडी माती या चित्रपटातील जीवा शिवाची बैलं जोडं... या गीताने रंगत आणली. जैत रे जैत चित्रपटातील आम्ही ठाकर ठाकर या गीताने महाराष्ट्रातील विविधतेची ओळख रसिकांना करून दिली. (प्रतिनिधी)लाभले आम्हास भाग्य : रसिकांचा सहभागइनामदार यांनी लाभले आम्हास भाग्य... हे मराठी अभिमान गीत सादर करताच रसिकांनी त्यांना साथ देत आपला सहभाग नोंदविला. इनामदार म्हणाले, संस्कृती टिकविण्याचे वाहन भाषा हे आहे. त्यामुळे मराठी भाषा वाढविणे, हा संस्कृती टिकविण्याचा उत्तम उपाय असून, प्रत्येकाने मातृभाषेचा अभिमान बाळगायला हवा. कार्यक्रमात नाट्यगीते आणि अजय-अतुल सारख्या आघाडीच्या गायकांची गीतेही सादर झाली. धनश्री कुलकर्णी, नीता गुरव, भाग्यश्री गोसावी, अविनाथ मातापूरकर, चंद्रकांत निगडे, अभिजित वाडेकर (गायन), दिलीप व्यास, राजेंद्र साळुंके (तालवाद्य), आकाश जाधव, श्रीकांत पत्की (सिंथेसायझर), महेश जोजारे (आॅक्टोपॅड), सिद्धी कोळवणकर आणि सहकलाकार यांनी नृत्य सादरीकरण केले. मिलिंद कुलकर्णी यांनी निवेदन सादर केले.