शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

पुण्यात पोलिसांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ' कल्चरल सेंटर' उभारले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 7:00 AM

आपलं अवघं आयुष्य पोलीस सेवेला समर्पित करूनही आपल्यातील कला जिवंत ठेवण्याचा ते कसोशीने प्रयत्न करतात...

ठळक मुद्देराज्यात अशाप्रकारचे हे पहिलेच सेंटर ठरणारशिवाजीनगर पोलीस स्टेशन बाजूस असलेल्या जागेत हे सेंटर उभे केले जाणार पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वत:च्या कलाकृती दाखविण्याची संधी मिळणार

नम्रता फडणीस पुणे :  जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या  पोलिसांमध्ये देखील अंगभूत कलागुण असतात. कुणी चांगले चित्र, कुणी सुंदर शिल्प काढतो तर कुणी उत्तम छायाचित्रकार असतो. याव्यतिरिक्तही अनेक कलाकौशल्य त्यांच्यात दडलेली असतात. मात्र स्वत: मधील ही कलात्मकता समाजासमोर आणण्याची फारशी संधीच त्यांना मिळत नाही.  त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याच्या उददेशाने  पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यात ' कल्चरल सेंटर' ची  निर्मिती केली जाणार आहे.  शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या बाजूस असलेल्या जागेत हे सेंटर उभारले जाणार असून, त्यासंबंधीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. खास पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी निर्माण केले जाणारे असे हे  राज्यातील पहिलेच सेंटर ठरणार आहे.  ' पोलीस ' म्हटले की चोवीस तास ऑनडयुटी. मात्र सामाजिक सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या या जनतेच्या शिलेदारांमध्येही अनेक कला दडलेल्या असतात. त्यांच्यातही अनेक चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार सुप्तपणे वावरत असतात. आपलं अवघं आयुष्य पोलीस सेवेला समर्पित करूनही आपल्यातील कला जिवंत ठेवण्याचा ते कसोशीने प्रयत्न करतात. परंतु  त्यांना आपल्यातील कलागुणांना वाव देण्याची फारशी संधी मिळत नाही आणि व्यासपीठही उपलब्ध होत नाही. याकरिताच स्वत:मधील कलाकौशल्य दाखविण्याची संधी त्यांना मिळावी हा या सेंटरच्या स्थापनेमागील हेतू असल्याची माहिती पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.  के.व्यंकटेशम म्हणाले, शिवाजीनगर पोलीस स्टेशन बाजूस असलेल्या जागेत हे सेंटर उभे केले जाणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वत:च्या कलाकृती दाखविण्याची संधी मिळणार आहे. या कल्चरल सेंटरमध्ये छोटीशी आर्ट गँलरी,  कलादालन, छोट्याशा कार्यक्रमांसाठी जागा यांचा समावेश असणार आहे. या सेंटरच्या उभारणीसाठी दीड कोटी रूपयांचा निधी उपलब्ध आहे. ही जागा पुणेपोलिसांच्याच ताब्यात असल्याने सेंटरसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या आठ ते नऊ महिन्यांमध्ये हे सेंटर उभे राहील. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस