शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

राज्यात भाताच्या अवघ्या ३४ टक्क्यांवर पेरण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 13:34 IST

राज्यात १ ते २२ जुलै या कालावधीत सरासरी ५०९ मिलिमीटर पाऊस होतो.

ठळक मुद्देपुणे-नाशिक विभाग मागे : तूर, मूग, उडीद पिकाचे क्षेत्र घटणार

पुणे : राज्यातील १०९ लाख ८२ हजार हेक्टरवरील पेरण्या झाल्या असल्या तरी भात क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने भाताच्या अवघ्या ३४ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. कापूस आणि सोयाबीनच्या पेरणीचा टक्का सरासरीच्या जवळ पोहचला आहे. पावसाअभावी तूर, मूग आणि उडीद पिकाच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. राज्यात १ ते २२ जुलै या कालावधीत सरासरी ५०९ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तो ३८६.६० (७५.३६ टक्के) इतका झाला आहे. वर्ध्यामधे सरासरीच्या पन्नास टक्के देखील पाऊस झालेला नाही. ठाणे, पालघर, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा शंभरटक्के पाऊस झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि बुलढाणा येथे सरासरीच्या ७५ ते शंभर टक्के पावसाची नोंद झाली असून, उर्वरीत १९ जिल्ह्यांमधे सरासरीच्या ५० ते ७५ टक्के पर्जन्यमान झाले आहे. राज्यात ऊस पीक वगळून खरीपाचे क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर असून, पैकी १०९.८२ लाख हेक्टरवर(७८.०७टक्के) पेरणी झाली आहे. ऊस पिकासह १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्र असून, ११०.३६ लाख हेक्टरवर (७३.७० टक्के) पेरणी आणि लागवडीची कामे झाली आहेत. कोकण विभागात ३६,३५५ आणि पुणे विभागात ४,९२९ हेक्टरवरील भात रोप वाटिकेची कामे झाली आहेत. कोकण विभागात भाताचे सरासरी क्षेत्र ३ लाख ९२ हजार ३९२ हेक्टर असून, पैकी २ लाख २९ हजार ६९० हेक्टरवर (५९ टक्के) पेरणी झाली आहे. कोल्हापूर विभागात भाताचे १ लाख ७८ हजार ७३१ हेक्टर क्षेत्र असून पैकी १ लाख ३६ हजार ५४७ (७६ टक्के) आणि पुणे विभागात ८० हजार ९०२ हेक्टरपैकी ३२ हजार ४० (४० टक्के) हेक्टरवर भात लावणी झाली. नाशिक विभागात ९६ हजार ३६१ हेक्टरपैकी २६ हजार १७१ (२७.२ टक्के) हेक्टरवर लागवडीची कामे झाली आहेत. राज्याचे भाताचे सरासरी क्षेत्र १५ लाख ८ हजार २२१ हेक्टर पैकी ५ लाख ११ हजार ८०८ हेक्टरवर (३४ टक्के) भात लागवडीची कामे उरकली आहेत. सोयाबीनचे क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३४ हेक्टर असून पैकी ३३ लाख ३ हजार ४७३ (९३ टक्के) आणि कापसाचे ४१ लाख ९१ हजार १४४ हेक्टरपैकी ४० लाख ६३ हजार ५५ हेक्टरवरील (९६.९४ टक्के) कामे पूर्ण झाली आहेत. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसNashikनाशिक