शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

कचरा व्यवस्थापनाला सीएसआरचा ठेंगा

By admin | Updated: March 17, 2015 00:22 IST

शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी तसेच या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेस मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे.

पुणे : शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी तसेच या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेस मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. यासाठी महापालिकेकडून कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) ची मदत घेण्याचा निर्णय घेतला असला. तरी, गेल्या वर्षभरापासून एकाही कंपनीने महापालिकेस मदत करण्यासाठी हात पुढे केलेला नसल्याची बाब समोर आली आहे. तर दुसरीकडे शिक्षण मंडळाला मदत करण्यासाठी कंपन्यांची रीघ लागली असल्याचे चित्र महापालिकेत दिसून येत आहे.सीएसआर कायद्याअंतर्गत ज्या बड्या कंपन्यांचा वार्षिक नफा ५ कोटींहून अधिक आहे. त्यांनी त्यातील २ टक्के हिस्सा सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. शहरातील कचरा समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने ती सोडविण्यासाठी या सीएसआर उपक्रमाअंतर्गत शहरात लहान कचरा प्रकल्प उभारणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे, कचरा बकेट वाटप करणे यासाठी निधी मिळविण्यासाठी महापालिकेकडून गेल्या वर्षभरापासून शहरातील आयटी कंपन्या; तसेच इतर व्यावसायिकाकडे पाठपुरावा केला. तसेच तत्कालीन आयुक्त महेश पाठक यांनीही शहरातील व्यावसायिक संघटनांची बैठक घेऊन याबाबत मदत करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यासाठी कोणीही पुढे आले नसल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली. या कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसला तरी, शहरातील कचऱ्याची सद्य:स्थिती पाहता महापालिकेस सीएसआरमधून मदत मिळाल्यास मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे शहरातील मोठ्या कंपन्यांशी पुन्हा एकदा चर्चा करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी आधी या कंपन्यांशी पत्रव्यवहार करण्याचे काम सुरू असल्याचे जगताप म्हणाले.या बड्या कंपन्यांच्या सीएसआरची मदत शिक्षण मंडळास देण्याकडे ओढा आहे. महापालिकेनेही त्यासाठी स्वतंत्र सीएसआर सेलची स्थापना केली असून त्या अंतर्गत शाळांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, या सेलच्या धर्तीवरच घनकचरा व्यवस्थापन विभागासाठीही स्वतंत्र सेल निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून त्याबाबत चाचपणी सुरू आहे.