मकरसंक्रांत म्हणजे, जानेवारी येणार पहिला सण. हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात मकरसंक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांती म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला 'मकर संक्रांत' असं म्हणतात. दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये मकरसंक्राती सण साजरा करतात. मात्र, मागील दहा महिन्यापासून कोरोनाचे संकट असल्याने, सर्वच सण साधे पणाने साजरे करण्यात आले होते. मागील काही महिन्यापासून, कोरोनाचे संकट कमी झाल्याने, जानेवारी महिन्यामध्ये येणार पहिला सण मकरसंक्रातीचा सण दोन दिवसावर आला असल्याने वाल्हे येथील मंगळवारच्या आठवडे बाजारांमध्ये अनेक महिलांनी, संक्रांतीच्या सणांसाठी लागणारे साहित्य आठवडे बाजारांमधून खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. खरेदीसाठी बाजारामध्ये येण्याअगोदरच शहीद शिंदे चौकामध्ये पोलिस थांबल्याने, अनेकांची धांदल उडाली होती. बाजारामध्ये जाणाऱ्यांना पोलिस मास्क वापरण्याचे आव्हान करत होते. आव्हान करूनही जर कोणी मास्क वापर नसेल तर त्यांना आर्थिक दंड भरावा लागत होता. वाल्हे परिसरामधील अनेक वाड्या- वस्ती, हरणी, पिंगोरी, मांडकी, दौंडज, आडाचीवाडी, वागदरवाडी, पिसुर्टी , राख, वागदरवाडी, जेऊर, सुकलवाडी आदी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामस्थ खरेदीसाठी येतात.
संक्रातीमुळे वाल्हे बाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:27 IST