राज्यभरातून भाविकांची गर्दी
By Admin | Updated: October 7, 2016 03:54 IST2016-10-07T03:54:30+5:302016-10-07T03:54:30+5:30
शिर्सुफळ येथील श्री शिरसाईदेवीचे स्थान त्रेतायुगातील आहे. हे क्षेत्र राज्यात प्रसिद्ध आहे. श्री शिरसाईदेवी अनेक भाविकांची कुलस्वामिनी आहे.

राज्यभरातून भाविकांची गर्दी
शिर्सुफळ : शिर्सुफळ येथील श्री शिरसाईदेवीचे स्थान त्रेतायुगातील आहे. हे क्षेत्र राज्यात प्रसिद्ध आहे. श्री शिरसाईदेवी अनेक भाविकांची कुलस्वामिनी आहे. त्यामुळेच येथे श्री शिरसाईदेवीच्या दर्शनासाठी गर्दी होत असते. तसेच, हे एक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
या ठिकाणी अनेक वर्षांपासून माकडांचे वास्तव्य आहे. येथील ग्रामस्थ माकडांना देव मानतात. त्यांची आनंदाने देखभाल करतात. येथील लोकांची अशी भावना आहे की, येथील माकडे म्हणजे श्री शिरसाईदेवीने गावाच्या रक्षणासाठी पाठवलेले सैनिक आहेत. तसा अनुभव अनेक गावकऱ्यांनी घेतलेला आहे. या गावाला ‘माकडांचे शिर्सुफळ’ म्हणून ओळखले जाते. राज्यात श्री शिरसाईदेवी अनेक भक्त आहेत.
४श्री शिरसाईदेवी विषयी अशी आख्यायिका सांगितली जाते, की हे क्षेत्र त्रेतायुगातील आहे. खूप पूर्वी म्हणजे त्रेतायुगात येथे एका राजाचे राज्य होते. राज्याच्या शेजारीच दंडकारण्यात राक्षस खूप मोठ्या प्रमाणात होते. ते राक्षस येथील प्रजाजनांना त्रास देत असत. त्यामुळे राजाने श्री रेणुका मातेची तपश्चर्या करण्यास सुरुवात केल.
४कठोर तपश्चर्या केली. श्री रेणुका मातेला प्रसन्न करून घेतले. देवी प्रसन्न झाल्यावर वर मागण्यास सांगितले. तेव्हा राजाने, माझ्या प्रजेचे या दैत्यांपासून रक्षण करावे, असा वर मागितला. आपण येथे कायमस्वरूपी राहावे, अशी विनंती केली. श्री देवीने ती मान्य करून दैत्यांशी युद्ध करून त्यांची शिरे छाटली शिरांची साई केली.
४येथील प्रजेला दैत्यांच्या त्रासापासून मुक्त केले. देवी राजाच्या विनंतीप्रमाणे शिरसाई नावाने स्थापन झाली. प्रजेत सुखशांती निर्माण होऊन प्रजा आनंदी झाली. देवीने दैत्यांपासून राज्यातील प्रजेची सुटका केली. प्रजेच्या रक्षणासाठी वानर सेनेची (माकडांची) नेमणूक केली, असे मानले जाते. म्हणून या गावात माकडांना देवाचा दर्जा दिला जातो.
श्री दुर्गा देवी मंदिरामध्ये
नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम
बारामती : बारामती शहरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरातील प्राचीन श्री दुर्गा देवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे २०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना पेशव्यांचे सरदार गोविंदराव कृष्णराव काळे यांनी केली होती. हे मंदिर दुर्गा पंचायतन मंदिर आहे. श्री दुर्गादेवीच्या गाभाऱ्याभोवती श्री विष्णुदेवाचे, श्री महादेवाचे, श्री गणेशाचे आणि सूर्यनारायणाचे अशी चार मंदिरे आहेत. मध्यभागी श्री दुर्गा देवीचे मंदिर आहे. यालाच श्री दुर्गा पंचायतन असे म्हणतात. नवरात्रोत्सवानिमित्त या मंदिरात श्री देवीचे सात दिवस सिंह, वाघ, हत्ती, हरिण, घोडा, मोर व क मळ या वेगवेगळ्या वाहनांवर पूजा केली जाते. कारण सात दिवस श्री दुर्गा देवीने महिषासुराशी युद्ध केले. आठव्या दिवशी अष्टमीला देवीने महिषासुराचा वध केल्याचा देखावा मांडला जातो. नवव्या दिवशी देवीची निवांत पाळण्यामध्ये बसलेली पूजा केली जाते. दहाव्या दिवशी दसऱ्याला अंबारीमध्ये बसलेली देवीची पूजा केली जाते. नवरात्रोत्सवादरम्यान मंदिरात देवीचा श्रीसूक्ताचा कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन व भजन, देवीचा जागर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुणवडी नवरात्रोत्सवानिमित्त
आनंदाचे वातावरण
४पिंपळी : गुणवडी (ता. बारामती) येथे जय भवानी मंदिरामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. सर्व ग्रामस्थ व जयभवानी तरुण मंडळातील सर्व कार्यकर्ते या उत्सवासाठी योगदान देत आहेत. सातव्या माळेला जयभवानी तरुण मंडळातील सर्व सभासद ज्योत आणण्यासाठी जातात. मंडळाचे हे २५वे वर्ष असून, आठव्या माळेला तुळजापूरहून २४ तासांत नवव्या माळेला गुणवडी गावामध्ये ज्योत घेऊन पोहोचतात.
४या नवरात्रोत्सवामध्ये फक्त भवानी मंदिरालाच विद्युतरोषणाई न करता संपूर्ण गावातील गुणेश्वर मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, हनुमान मंदिर, गणपती मंदिर, लक्ष्मी मंदिर, भवानी मंदिराकडे येणारे दोन्ही रस्ते या ठिकाणी आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. हा सर्व खर्च मंडळातील सर्व सभासदांनी स्वखचार्तून केला आहे.
४१०व्या माळेच्या दिवशी होमहवन, नैवेद्य, परडी भरणे हे कार्यक्रम पार पडतात. ११व्या दिवशी संपूर्ण गावातून श्रींची पालखी छबिना काढून, दुपारी ४ ते सायंकाळी ७ सीमोल्लंघन करून देवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता केली जाते.
दौंडला नवरात्रानिमित्त विविध कार्यक्रम
४दौंड : येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी नवरात्र मंडळांत गरबा नृत्य, विविध स्पर्धा सुरू आहेत. तर, देवीच्या मंदिरांना विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.
४येथील हिंद टॉकीजजवळ असलेल्या नवभार क्रीडा मंडळाच्या वतीने भीमाईमाता नवरात्रोत्सव मंडळाने देवीचा जागर, देवीचे गाणे, घागरी फुंकण्याचा कार्यक्रम, होमहवन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत.
४मंडळाचे अध्यक्ष आकाश लोडी, रुतिक लोडी, सागर रणपिसे, शुभम ठाणेदार, शंकर लोडी, संजय कोठारे, सिद्धार्थ थोरात, राहुल कांबळे, सिद्धार्थ ठाणेदार, राजू कोठारे, गोरख पवार, सोहन संसारे यांच्यासह कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळत आहे. (वार्ताहर)