मुंबईतल्या भाजपा अधिवेशनाला गाड्या आणल्याच पाहिजेत, गिरीश बापट यांची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 08:43 PM2018-03-31T20:43:44+5:302018-03-31T20:43:44+5:30

crowd compalsary for BJP convention in Mumbai, girish bapat | मुंबईतल्या भाजपा अधिवेशनाला गाड्या आणल्याच पाहिजेत, गिरीश बापट यांची तंबी

मुंबईतल्या भाजपा अधिवेशनाला गाड्या आणल्याच पाहिजेत, गिरीश बापट यांची तंबी

Next
ठळक मुद्देमहापौर निवासस्थानी यासंदर्भात झालेल्या बैठकीत पक्षाचे खासदार,आमदार व नगरसेवकांत तूतूमैमैअडचणी असतील तर त्या दूर करू, मात्र, जबाबदारी घ्यावीच लागेल

पुणे : मुंबईत ६ एप्रिल रोजी होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनात पुण्यातून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी भाजप शहर शाखेचे जोरदार नियोजन सुरू आहे. महापौर निवासस्थानी यासंदर्भात झालेल्या बैठकीत पक्षाचे आमदार व खासदार यांच्यात तूतूमैमै झाले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी मात्र सर्वांनाच कार्यकर्त्यांसहीत किमान ५ मोठ्या गाड्या तरी आणल्या पाहिजे अशी तंबी दिली. 
या बैठकीला खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, मेधा कुलकर्णी तसेच महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक तसेच सर्व समित्यांचे मावळते सभापती, नगरसेवक व पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले बैठकीला उपस्थित होते. मुंबईपासून पुणे जवळ आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. पुण्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकानेच यात सहयोग दिला पाहिजे. पक्षाने तुम्हाला भरपूर दिले आहे, आता तुम्ही पक्षाला द्या, प्रत्येकाने किमान ५ व कितीही मोठ्या गाड्यांसहित कार्यकर्ते घेऊन अधिवेशनाला आले पाहिजे असे बापट यांनी सांगितले.
त्यावरूनच ठिणगी पडली. एका आमदारांनी नगरसेवक पालिकेत काय करतात त्याकडे आम्ही कधीतरी लक्ष देतो का, मग आता त्यांच्यावरच मोठी जबाबदारी द्यावी असे सुचवले. त्यामुळे काही नगरसेवकांनी राग व्यक्त केला. आमदार काय करतात ते आम्हाला माहिती नाही का असे ते म्हणाले. बापट यांनी यात मध्यस्थी करताना पक्षाच्या यावर्षी मुंबईत होणाºया अधिवेशनाकडे विरोधकांसहीत जनतेचेही लक्ष आहे. तिथे उच्चांकी गर्दी करण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. त्यात आपल्याला सहयोग द्यायचा आहे. आपण स्वत: २५ गाड्या नेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी गाड्या आणल्याच पाहिेजे, पुण्याची गर्दी तिथे सर्वात जास्त दिसली पाहिजे असे सांगितले.
खासदार शिरोळे यांनी बैठकीत सर्वात शेवटी वेगळाच सुरू लावला. बैठकीला किमान ३० पेक्षा जास्त नगरसेवक उपस्थित नाहीत. सहयोगी खासदार असलेले संजय काकडे नाही? असे का असा प्रश्न त्यांनी विचारला. ते का आले नाहीत, त्याची कारणे काय याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला पाहिेजे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे ते म्हणाले. उपस्थित नगरसेवकांपैकी काहींनी ५ मोठ्या गाड्या आणणे कसे शक्य आहे अशी विचारणा केली. शाळांच्या परीक्षा सुरू आहे. इतक्या मोठ्या संख्येने तिकडे येण्यासाठी कार्यकर्ते उपलब्ध होणार नाही अशी कारणे दिली. त्यावर कारणे सांगू नका, अडचणी असतील तर त्या दूर करू, मात्र, जबाबदारी घ्यावीच लागेल असे बापट व गोगावले यांनी बजावले. त्यानंतर आमदारांची स्वतंत्रपणे बैठक घेण्यात आली.     

Web Title: crowd compalsary for BJP convention in Mumbai, girish bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.