शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून आचारसंहितेचा भंग: परवानगी न घेता बैठकीचे आयोजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 16:16 IST

निवडणुकीत किमान  ४८ तास अगोदर प्रचार रॅली,बैठका,सभा, कोपरा सभा आंदीसाठी परवानगी मागणे गरजेचे आहे.

पुणे ( चंदननगर) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने वडगावशेरी येथील नगर रोडवर लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात भाजपा व शिवसेना पक्षाची बैठक बुधवारी(दि.२७)  आयोजित करण्यात आली होती .या बैठकीला कायदेशीर कोणतीही परवानगी न घेता आयोजन करून भाजपाकडून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे . नगररस्त्यावर इनॉर्बिट मॉलशेजारी शिवांजली मंगल कार्यालयात भाजप उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला चंदननगर पोलिस ठाण्याकडून कोणतीही परवानगी न घेता आयोजित केली होती. या बैठकीला स्पीकर लावून आदर्श आचारसंहितेचा भंग केला म्हणून फिर्यादी ए.पी.ओव्हाळ राज्यकर अधिकारी विक्रीकर भवन यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवार पासून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ येथे निवडणूक कार्यालय येरवडा पुणे भरारी पथकातील प्रमुख नेमणूक करण्यात आलेले आहे. यांनी आरोपी  भारतीय जनता पार्टीचे वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष संतोष लक्ष्मण राजगुरू यांच्या विरोधात आदर्श  आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.-----किमान ४८ तास अगोदर परवानगी मागावी....निवडणुकीत किमान  ४८ तास अगोदर प्रचार रॅली,बैठका,सभा, कोपरा सभा आंदीसाठी परवानगी मागणे गरजेचे असुन ,निवडणुकीत सर्वांची बाजू, ठिकाण पाहुणच परवानगी देण्यात येते ....-----सदर बैठकीला भाजपचे वडगावशेरी अध्यक्ष संतोष राजगुरू यांनी परवानगी मागितली होती मात्र ही परवानगी परवानगी आचारसंहिते मध्ये किमान २४  ते १८ तास अगोदर मागणे गरजेचे असून ती उशिरा मागितल्यामुळे परवानगी देऊ शकलो नाहीत व त्यांच्या वरती कलम १८८ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.-कृष्णा इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस ठाणे --------सदर बैठकीला परवानगी नाकारण्यात आल्यामुळे आम्ही या बैठक आयोजकावर  आदर्श आचारसहिंता भंग केल्याप्रकरणी मी स्वत: चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.- एन.पी.ओव्हाळ , भरारी पथक प्रमुख,वडगावशेरी विधानसभा-----

टॅग्स :PuneपुणेChandan NagarचंदननगरBJPभाजपाLok Sabha Bypoll Results 2018लोकसभा पोटनिवडणूक निकाल 2018