शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा पीककर्जाचा पुरवठा लवकरच वेळेवर होणार; साडेचार हजार संस्थांचे संगणकीकरण सुरू

By नितीन चौधरी | Updated: November 1, 2023 16:17 IST

केंद्र आणि राज्य सरकारमार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला १५३ कोटी रुपये खर्च येणार

पुणे : शेतकऱ्यांना पीककर्जाचा पुरवठा वेळेवर व्हावा, यासाठी राज्यात कृषी पतपुरवठा करणाऱ्या सर्व विविध कार्यकारी सेवा संस्थांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ हजार संस्थांची निवड करण्यात आली असून, आतापर्यंत साडेचार हजार संस्थांच्या संगणकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या तीन ते पाच वर्षांत त्याची अमंलबजावणी होणार आहे, अशी माहिती सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिली.

केंद्र आणि राज्य सरकारमार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला १५३ कोटी रुपये खर्च येणार आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी पीककर्ज पुरवठ्यासाठी देशातील सर्व विविध कार्यकारी सेवा संस्थांचे संगणकीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत देशातील ६३ हजार सेवा संस्थांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. त्यात राज्यातील १२ हजार सेवा संस्थांचा समावेश आहे.सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त असलेले अनेक मोठे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. राज्याच्या सहकार विभागामार्फत या सर्व निर्णयांची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था स्वावलंबी व्हाव्यात आणि त्या कार्यक्षमपणे चालू राहाव्यात, यादृष्टीनेही प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिली.

२० हजारांहून अधिक संस्था कार्यरत

राज्यात सध्या कर्जपुरवठ्याची त्रिस्तरीय व्यवस्था अस्तित्वात असून राज्य, जिल्हा बॅंकेसह गावपातळीवर विविध कार्यकारी सेवा संस्था कार्यरत आहेत. सद्यःस्थितीत राज्यात २० हजारांहून अधिक विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा संस्था कार्यरत आहेत. या संस्था आर्थिकदृष्ट्या बळकट करणे, त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना पतपुरवठा करण्याबरोबरच विविध सेवा व वस्तूंचा पुरवठा करणे, हा केंद्र सरकारच्या निर्णयामागील उद्देश आहे. त्यानुसार या संस्थांचे संगणकीकरण केले जात आहे.

येत्या पाच वर्षांत १२ संस्थाचे हाेणार संगणकीकरण

संगणकीकरणासाठी सिस्टम इंटिग्रेटरची नेमणूक करण्यात आली असून त्या माध्यमातून या सर्व संस्था ६ ते ७ टप्प्यांत संगणकीकृत करण्याचे काम सुरू आहे. येत्या ३ ते ५ वर्षांत या सर्व १२ हजार संस्थांचे संगणकीकरण पूर्ण होईल अशी माहितीही कवडे यांनी दिली. त्यांच्याविषयी असलेल्या कायद्यातील पोटनियमामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यामुळे या संस्थांना बाहेरील स्त्रोतांकडून कर्ज घेण्याच्या मर्यादेत वाढ झाली आहे, असेही कवडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीMONEYपैसाGovernmentसरकारSocialसामाजिक