शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

देशात काँग्रेसचे अस्तित्व नाही, पक्षात मोठी नकारात्मकता; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 19:12 IST

नुसता विरोध करणे हा काँग्रेसचा ठरलेला कार्यक्रम झालाय...

- राजू इनामदार

पुणे: देशभरात सध्या काँग्रेसचं कुठेच अस्तित्व राहिलेले नाही. या पक्षाचा आवाज ना संसदेत आहे, ना रस्त्यावर ना लोकांमध्ये. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी नकारात्मकता आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही काम करत असतील तर त्यावर नुसती टीका आणि विरोध करणे हा काँग्रेसचा ठरलेला कार्यक्रम झाला असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेकजण त्यांना काहीही माहिती नसताना बोलतात त्यामुळे ज्यांना माहिती नाही अशा विरोधकांच्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. पत्रकारांनी ठाकरे सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार चौकशीप्रकरणी प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, जिथे गडबड आहे किंवा ज्याठिकाणी अनियमितता दिसतेय अशी कुठलीही चौकशी बंद होणार नाही. पण जिथे गडबड नाही आणि जाणीवपूर्वक राजकीयदृष्ट्या चौकशी लावली आहे अशा चौकशी बंद केल्या जातील.

नांदेडमध्ये गोंधळ नाही-

नाना पटोलेंना वारंवार झटके येत असतात, त्यामुळे काहीही बोलत असतात, असा पलटवार फडणवीस यांनी पटोलेंवर केला. नांदेडमध्ये कुठेही धक्काबुक्की झाले नाही किंवा कुठेही लाठीचार्ज झाला नाही. विद्यार्थी पोलीस भरतीची मागणी करत होते. त्यावेळी मी जाऊन त्यांना भेटलो. लवकरच पोलिस भरती करणार असल्याचे आश्वासनही विद्यार्थ्यांना दिले, असं फडणवीस म्हणाले.

अजित पवारांना भरपूर वेळ-

सध्या अजित पवारांकडे खूप वेळ आहे त्यामुळे ते असे आरोप करत असतात. ते काय बोलतात यावर उत्तर द्यायला मला थोडीच वेळ आहे, मला खूप काम आहेत, असं फडणवीस म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेस