शोरुमवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील गुन्हेगार गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST2021-02-05T05:14:41+5:302021-02-05T05:14:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्ड येथील दुचाकीच्या शोरुमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ४ ...

शोरुमवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील गुन्हेगार गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केट यार्ड येथील दुचाकीच्या शोरुमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने पकडले.
कोंडिबा ऊर्फ नाना बाबू पांढरे (वय ३५, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड), प्रसाद आनंदा मालुसरे (वय २६, रा. तांभोर), गणेश भीमा शिंदे (वय ३०, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड), आकाश भगवान दुधाळे (वय २३, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड, मूळ इंदोर), अविनाश राम निंबाळकर (वय २३, रा. मार्केट यार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे यांना मार्केट यार्ड येथील नंदनवन लॉजच्या गल्लीत दरोडा टाकण्याच्या तयारीत ४ ते ५ जण थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी पथक तयार करुन बुधवारी रात्री तेथे छापा टाकून ५ जणांना पकडले. त्यांच्याकडून २ कोयते, १कटावणी, ५ मोबाईल, मिरची पावडर, नॉयलॉन दोरी असा ३५ हजार रुपयांचा माल जप्त केला. हे सर्व जण सराईत गुन्हेगार आहेत. पांढरे याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल असून मालुसरे याच्याविरुद्ध २ तर शिंदे याच्याविरुद्ध ६ गुन्हे दाखल आहेत. आकाश दुधाळे हा मध्य प्रदेशातील इंदोरचा राहणारा असून गुन्हा करण्यासाठी तो पुण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडे चौकशी करता मार्केट यार्डातील दुचाकीचे शोरुम लुटण्याचा कट त्यांनी आखला असल्याचे उघडकीस आले आहे.
अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंह, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप जमदाडे, उपनिरीक्षक दीपक माने, शशिकांत शिंदे, रुपेश वाघमारे, सचिन ढवळे, दीपक भुजबळ, शंकर पाटील, सुरेंद्र साबळे, नागेश कुॅवर, राकेश खुनवे, प्रवीण कराळे, प्रवीण भालचिम, स्वप्निल कांबळे, कौस्तुभ जाधव, विशाल शिर्के, सागर वाघमारे, शीतल शिंदे यांनी केली आहे.