विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

By Admin | Updated: October 10, 2016 02:19 IST2016-10-10T02:19:00+5:302016-10-10T02:19:00+5:30

दुकान बंद करून घरी परतत असलेल्या युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला

Criminal offense for molestation | विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

लोणी काळभोर : दुकान बंद करून घरी परतत असलेल्या युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ८ आॅक्टोबर रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत लोणी फाटा येथील स्मशानभूमी नजीकच्या रस्त्यावर घडली.


फिर्यादी युवती आपल्या घरी चालली होती. त्या वेळी अनोळखी व्यक्तीने तिचा विनयभंग केला. त्या युवतीने आरडाओरडा केल्यामुळे तो पळून गेला. या युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
(वार्ताहर)

Web Title: Criminal offense for molestation