शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पेस्ट कंट्रोल कंपनीला न्यायालयाचा दणका

By admin | Updated: April 14, 2017 04:16 IST

परवाना नूतनीकरण न करताच पेस्ट कंट्रोल करणाऱ्या शहरातील शनिवार पेठेतील कंपनीला शिवाजीनगर न्यायालयाने दंड ठोठावला आहे. निस्ट पेस्टो सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीला

पुणे : परवाना नूतनीकरण न करताच पेस्ट कंट्रोल करणाऱ्या शहरातील शनिवार पेठेतील कंपनीला शिवाजीनगर न्यायालयाने दंड ठोठावला आहे. निस्ट पेस्टो सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीला (मालक विलास चव्हाण) एक हजार रुपयांचा दंड न्यायालयाने सुनावल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी दिली. पेस्ट कंट्रोलसाठी परवाना नूतनीकरण न केल्याबद्दल कृषी विभागाने केलेली ही पहिली कारवाई आहे. नूतनीकरण न करताच कंपनी पेस्ट कंट्रोल करत असल्याची तक्रार हवेली पंचायत समितीच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण निरीक्षकांकडे आली होती. याप्रकरणी कंपनीच्या परवान्याबाबत चौकशी केल्यानंतर कंपनीकडे परवाना आहे; परंतु कंपनीने परवाना नूतनीकरण केला नसल्याचा प्रकार समोर आला. कंपनीच्या गोडाऊनची तपासणी केल्यानंतर पेस्ट कंट्रोल परवाना ५ डिसेंबर रोजी संपलेला असल्याचे आढळून आले. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग पेस्ट कंट्रोल करण्यासाठी परवानगी देतो. हा परवाना दोन वर्षातून नूतनीकरण करावा लागतो. सध्या जिल्ह्यात ३१० जणांकडे पेस्ट कंट्रोल करण्याचा परवाना आहे. घरात पेस्ट कंट्रोल करताना योग्य काळजी न घेतल्याने गुदमरून अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना ताज्या आहेत. त्यातच परवानगी न घेता किंवा नूतनीकरण न करता पेस्ट कंट्रोल करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला होणारा धोका पाहून कृषी विभागाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे.(प्रतिनिधी)

-  गुण नियंत्रण निरीक्षकांनी न्यायालयात खटला दाखल केला. याप्रकरणी सुनावणी होऊन कंपनीस कीटकनाशक अधिनियम १९७१ कलम १० (३) नुसार एक हजार रुपयांचा दंड सुनाविण्यात आला.पेस्ट कंट्रोल करण्यास विनापरवाना मनाई आहे. तसेच ज्यांच्याकडे परवाना आहे; परंतु ज्यांनी नूतनीकरण केले नाही, अशांनीही परवान्याचे नूतनीकरण करावे, अनधिकृतपणे पेस्ट कंट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीही कृषी विभागाचा अधिकृत परवाना घेतलेल्या परवानाधारकाकडूनच पेस्ट कंट्रोल करून घ्यावे. - सुनील खैरनार, जिल्हा कृषी विकास अधिकारी