बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा, फसवणूक प्रकरण : फ्लॅट खरेदी व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 07:22 IST2018-02-20T07:22:36+5:302018-02-20T07:22:40+5:30
फ्लॅट खरेदी व्यवहारात १ कोटी १६ लाख रुपये घेऊन फ्लॅटचा ताबा न दिल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक मिलिंद बुद्धिसागर यांच्याविरुद्ध मोफा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा, फसवणूक प्रकरण : फ्लॅट खरेदी व्यवहार
पुणे : फ्लॅट खरेदी व्यवहारात १ कोटी १६ लाख रुपये घेऊन फ्लॅटचा ताबा न दिल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक मिलिंद बुद्धिसागर यांच्याविरुद्ध मोफा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी होम डेव्हलपर्सचे मिलिंद बुद्धिसागर आणि त्यांची पत्नी स्मिता बुद्धिसागर (रा़ भाग्यतारा, एरंडवणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याप्रकरणी प्रदीप शंकर काळे (रा़ श्रीनिवास बिल्डिंग, पटवर्धनबाग, एरंडवणे) यांनी फिर्याद दिली आहे़
काळे दाम्पत्याने डिसेंबर २०१५ मध्ये होम डेव्हलपर्स यांच्याकडे सदाशिव पेठेतील लक्ष्मीकुंज इमारतीत तिसºया मजल्यावरील फ्लॅट बुक केला होता़ बुद्धिसागर यांनी या फ्लॅटचा ताबा डिसेंबर २०१६ मध्ये देण्याचे करारनाम्यामध्ये कबूल केले होते़ त्यानुसार बुद्धिसागर यांनी काळे यांच्याकडून १ कोटी १६ लाख रुपये घेतले़ नोव्हेंबर २०१६ पर्यंत या इमारतीचे तिसºया मजल्यापर्यंतचे बांधकाम झाले़ त्यानंतर इमारतीचे काम बंद पडले़
काळे यांनी याबाबत विचारणा केल्यावर त्यांना वेगवेगळी कारणे देण्यात आली़ त्यानंतरही अजून काम सुरू झाले नसल्याचे काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे़ विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत़