शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Video देशातील महिलांची फसवणूक केली म्हणून पंतप्रधानांवर गुन्हाच दाखल करायला हवा : राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 15:53 IST

गॅस दरवाढीवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस आक्रमक; पंतप्रधानांना पाठवल्या चक्क गोवऱ्या अन् लाकडं 

पुणे: पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किमतीत गेल्या काही महिन्यात उच्चांकी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. एकीकडे कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडले असताना सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला वाढत्या इंधन दरवाढीमुळे चांगलाच भुर्दंड बसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आक्रमक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्यामहिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देशातील महिलांची फसवणूक केल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हाच दाखल करायला हवा अशा शब्दात जोरदार टीका केली आहे. 

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने गॅस सिलेंडर दरवाढ व एकूणच महागाईच्या विरोधात पुण्यात शनिवारी ( दि. ४ ) दोन वेगवेगळी आंदोलनं करण्यात आली.  राष्ट्रवादी महिला आघाडीने रक्षा बंधनाची भेट म्हणून पंतप्रधानांना चक्क गोवऱ्या तर काँग्रेस महिला आघाडीने लाकडं पाठवण्यासाठी म्हणून जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्द केली. निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांच्याकडे पंतप्रधानांना पाठवण्यासाठी म्हणून लाकडाचे तुकडे देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर  म्हणाल्या, उज्ज्वला गॅससारख्या योजनेची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली व प्रत्यक्षात मात्र गँसचे दर गगनाला नेऊन भिडवले. खरे तर देशातील महिलांची फसवणूक केली म्हणून पंतप्रधानांवर गुन्हाच दाखल करायला हवा अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केली. दर आठ - पंधरा दिवसांनी स्वयंपाकाच्या गॅसची किंमत वाढवून मोदी देशातील भगिनींना रक्षाबंधनाची ओवाळणी घालत आहेत. त्यामुळेच आता त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून आम्ही शेणाच्या गोवऱ्या पाठवत आहोत.  

सिटी पोस्ट चौकात झालेल्या या आंदोलनात महापालिकेतील.विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ, शहराध्यक्षा मृणालिणी वाणी, तसेच अनिता पवार, पुनम पाटील, भावना पाटील, मीना पवार, नीता गलांडे, ज्योती सुर्यवंशी, सुनिता डांगे व अन्य महिला सहभागी झाल्या होत्या. तर काँग्रेस महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. शहराध्यक्ष सोनाली मारणे,  शर्वरी गोतरणे, छाया जाधव, राजश्री अडसूळ, संगीता पवार, शिवानी माने अन्य महिला यात सहभागी होत्या. मारणे यांनी सांगितले की, सामान्य नागरिकांना गॅस महागल्यामुळे आता पुन्हा लाकडांवर स्वयंपाकाची वेळ आली. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीFuel Hikeइंधन दरवाढCylinderगॅस सिलेंडरWomenमहिला