शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारावर धमकी व विनयभंगाचा गुन्हा; बड्या शासकीय महिला अधिकाऱ्यांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 10:10 IST

पत्रकाराने संकेतस्थळावर बातम्या देऊ , तक्रारी करू अशा धमक्या देऊन वेगवेगळ्या कारणाने त्रस्त केल्याच्या तक्रारी समोर येत होत्या

चाकण : बदनामीची भीती दाखवत, विनयभंग करणाऱ्या कथित पत्रकारावर विनयभंग, धमकी , शासकीय कामात अडथळा अशा विविध कलमान्वये चाकण पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण मधील एका शासकीय महिला अधिकाऱ्याने या बाबत फिर्याद दिली असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे.  आशिष ढगे पाटील ( सध्या रा. खराबवाडी, चाकण , ता. खेड , मूळ रा. अहमदनगर ) असे गुन्हा दाखल झालेल्या कथित पत्रकाराचे नाव आहे. चाकण मधील एका शासकीय महिला अधिकारी यांनी चाकण पोलिसांत या बाबत तक्रार दिली आहे. चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिला अधिकारी यांना मागील काही दिवसांत वारंवार भेटून त्यांच्या दिसण्यावर अत्यंत अश्लील टिपण्या आशिष ढगे याने केल्या होत्या. संबंधित महिला अधिकारी यांच्या कुटुंबियांच्या समोर देखील त्याने असे प्रकार केले होते. संबंधित माहिला अधिकारी यांना कथित पत्रकार ढगे याने त्यांच्या कार्यालयात जाऊन धमकी दिल्याचा प्रकार देखील घडला होता. चाकण पोलिसांनी संबंधित शासकीय अधिकारी महिला यांच्या तक्रारी वरून  विनयभंग, धमकी , शासकीय कामात अडथळा अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कथित पत्रकार ढगे फरारी झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. अधिक तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड व त्यांचे सहकारी करत आहेत.

अनेकांच्या तक्रारी  चाकण औद्योगिक भागातील विविध गावांमध्ये अनेक शैक्षणिक संस्था , शिक्षक, व्यवसायिक, उद्योजक आणि व्यक्ती यांना संबंधित आशिष ढगे याने संकेतस्थळावर बातम्या देऊ , तक्रारी करू अशा धमक्या देऊन वेगवेगळ्या कारणाने त्रस्त केल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. चाकण औद्योगिक भागात काही महिलांना हाताशी धरून खोट्या तक्रारी करण्यास भाग पाडून त्यामध्ये तडजोडी करून मोठ्या मोठ्या रकमांची मागणी केल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत.

तोतया पत्रकारांचे पेव 

 चाकण मध्ये मोठ्या प्रमाणावर तोतया पत्रकार उदयास आले असून त्यांच्याकडून गैरप्रकार , जमिनींचे ताबे, शासकीय कार्यालयात उठबस व तडजोडी, बदनामीच्या धमक्या देऊन वेगवेगळ्या मागण्या करण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.

टॅग्स :PuneपुणेChakanचाकणJournalistपत्रकारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी