Crime News : पुणे जिल्ह्यातील दौंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आईसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून एकाची हत्या केल्याचे समोर आले. आरोपीने प्राण घातक हल्ला केल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणामुळे दौंड परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी १४ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली. विशाल थोरात (रा. इंदिरानगर, दौंड) या तरुणाने प्रवीण पवार यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पवार गंभीर जखमी झाले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला त्याच्या आईचे आणि प्रवीण पवार यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातूनच त्याने प्रवीण पवार यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. पवार यांच्या डोक्यावर आणि हातावर वार केल्याने जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी विशाल थोरात याला अटक केली आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.