शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : बैलगाडा मालकाचे अपहरण करून खून; मृतदेह जाळून लावली विल्हेवाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 11:21 IST

मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे गुरुवारी (दि.२१) ही घटना उघडकीस आली.

पिंपरी : प्रसिद्ध बैलगाडा मालकाचे अपहरण करून खून केला. त्यानंतर मृतदेह जाळून विल्हेवाट लावून खंडणीचा बनाव केला. पिंपरी-चिंचवड, पुणे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी गुन्ह्याची उकल करून संशयितास अटक केली. मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे गुरुवारी (दि.२१) ही घटना उघडकीस आली.पंडित रामचंद्र जाधव (५२, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) असे खून झालेल्या गाडामालकाचे नाव आहे. सूरज मच्छिंद्र वानखेडे (२३, रा. नवलाख उंब्रे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज याने त्याचा मित्र रणजित कुमार (रा. बिहार) याच्या मदतीने पंडित जाधव यांचे ५० लाखांच्या खंडणीचा बनाव करून अपहरण केले. वैयक्तिक कारणावरून त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर खेड तालुक्यातील वहागाव येथील डोंगरावर कारमधून मृतदेह नेला. तेथे मृतदेह जाळून विल्हेवाट लावली. त्यानंतर कार घराच्या परिसरात लावली. तसेच त्यांच्या मोबाईलच्या व्हाॅट्सॲपवरून मेसेज करून ५० लाखांची खंडणी मागितल्याचा बनाव केला.दरम्यान, पंडित जाधव हे १८ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने तपास करताना तांत्रिक विश्लेषण केले असता सूरज याच्यावर संशय बळावला. तो मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता गुन्ह्याची उकल झाली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKidnappingअपहरण