शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक; नागरिकाला मारहाण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 18:49 IST

ह्दयशस्त्रक्रिया झालेल्या नागरिकाला लाथाबुक्यांनी केली मारहाण

पुणे : ह्दयशस्त्रक्रिया झालेल्या नागरिकाला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह एका महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यत आला आहे. त्यानंतर चतुःश्रुंगी पोलिसांनी जाधव यांना मंगळवारी दुपारी अटक केली. 

हर्षवर्धन रायभान जाधव (वय ४३, रा. बालेवाडी) आणि इषा बालाकांत झा (वय ३७, रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमन अजय चड्डा (वय २८, रा. बोपोडी) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या रोडवर संघवीनगर येथे सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चड्डा यांचे आईवडील दुचाकीवरुन ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन दवाखान्यात निघाले होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी अचानक त्यांच्या कारचा दरवाजा उघडला. त्यामुळे दुचाकीवरुन जाणार्या चड्डा यांच्या आईच्या पायाला मार लागला. याबाबत त्यांच्या वडिलांनी जाधव यांना जाब विचारला. त्यावरुन त्यांच्यात वादावादीला सुरुवात झाली. फिर्यादीच्या वडीलांनी आपलेी ह्दयशस्त्रक्रिया झाली असल्याचे त्यांना सांगत होते. तरीही जाधव यांनी त्यांच्या छातीत व पोटात लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यांच्या आईलाही लाथ मारली. त्यात ते गंभीर जखमी झाले. दोघांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जिवीतास धोका निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या जखमी दाम्पत्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी हर्षवर्धन जाधव व इषा झा यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र दहीफळे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस