शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

चारा छावणीत जनावरांना प्रवेश नाकारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा : विजय शिवतारे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 20:02 IST

शिरूरमधील एका साखर कारखान्यात सुरू असलेल्या चारा छावणीत ठराविक शेतक-यांच्या जनावरांना प्रवेश दिला जात असल्याची तक्रार केली.

ठळक मुद्देप्रत्येक चारा छावणीच्या बाहेर ‘शासन अनुदानित चारा छावणी’असे नाम फलक लावावेत..

पुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या अनुदानीत चारा छावण्यांमध्ये जनावरे घेण्यास संस्थांकडून नकार दिला जात असल्याची तक्रार शेतक-यांकडून प्राप्त झाल्यास संबंधित संस्थेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी दिले.त्याचप्रमाणे प्रत्येक चारा छावणीच्या बाहेर ‘शासन अनुदानित चारा छावणी’असे नाम फलक लावावेत, अशी सुचनाही शिवतारे यांनी केली.  पुणे जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्व 2019 नियोजन बैठकीत शिवतारे बोलत होते. या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, आमदार भिमराव तापकीर, बाबुराव पाचर्णे, शरद सोनवणे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे,शिरूर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहगडे, बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले व पंचायत समिती सदस्या निर्मला काळोखे, सुवणा शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.जी पलघडमल, कृषी अधिकारी सुनील खैरनार, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत भोर आदी उपस्थित होते.शिरूरमधील एका साखर कारखान्यात सुरू असलेल्या चारा छावणीत ठराविक शेतक-यांच्या जनावरांना प्रवेश दिला जात असल्याची तक्रार बाबुराव पाचर्णे यांनी बैठकीत केली. त्यावर संबंधित छावणी शासकीय असल्यास त्या ठिकाणी मोठा फलक लावावा,तसेच यापुढे कोणी चारा छावण्यात जनावरांना प्रवेश देताना दुजाभाव करत असल्याचे आढळून आले. तसेच शेतक-यांकडून त्याबाबत लेखी तक्रार प्राप्त झाली तर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा,अशा सुचना शिवतारे यांनी दिल्या. त्याचप्रमाणे साताऱ्यात शेळ्या मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू झाली आहे.पुण्यातही मागणी असल्यास शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू करावी,असे शिवतारे म्हणाले.जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात नऊ चारा छावण्यांना मंजूरी दिली असून त्यातील काही छावण्या बारामती,शिरूर व पुरंदर तालुक्यात सुरू झाल्याचे सांगितले. तसेच वेळोवेळी चारा छावण्यांचा आढावा घेतला जाईल,असे स्पष्ट केले. बैठकीमध्ये राज्यमंत्री शिवतारे यांनी जिल्ह्यातील खरीप हंगाम 2019 साठी आवश्यक बियाणे व रासायनिक खतांचे नियोजन, कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण, खरीप रब्बी सन 2018-19 पीक कर्ज वाटपाबाबतची माहिती घेतली. तसेच टंचाई नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना,भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड आदी योजनांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक सूचना केल्या.---------------------------

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीdroughtदुष्काळ