शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मास्क आणि जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री करणाऱ्या तीन दुकानदारावर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 21:02 IST

लॉकडाऊनचा दुकानदार घेतात गैरफायदा 

ठळक मुद्देगुन्हे शाखा युनिट 4 कडून कारवाई

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकानी संचारबंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशावेळी केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र आता काही दुकानदार या लॉकडाऊनचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून आले आहे. चढ्या दराने मास्क आणि किराणा मालाची विक्री करत आहेत. अशा तीन दुकानदारावर गुन्हे शाखा युनिट 4 कडून कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूंडाराम खिनवाराम चौधरी (वय 30, रा.सागर पार्क लेन 1, वडगाव शेरी), हेमाराम नैनाराम चौधरी (वय 43, रा.नागपूर चाळ, येरवडा) आणि रमेश जेठाजी चौधरी (वय 35, रा.धनश्री अपार्टमेंट, औंध) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदारांची नावे आहेत. भूंडाराम याचे चंदननगर याठिकाणी पवित्र मेडिकल स्टोअर्स आहे. या दुकानात त्याने कापडी मास्क विक्रीसाठी ठेवले आहेत. या दुपदरी कापडी मास्कची किंमत 16 रुपये असताना तो ग्राहकांकडून 50 रुपये घेत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय झंझाड, सहायक फौजदार अब्दूलकरीम सय्यद आणि पोलीस नाईक सुरेंद्र साबळे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नागपूर चाळ याठिकाणी महालक्ष्मी सुपर मार्केट या नावाने किराणा मालाचे दुकान असणारे हेमाराम आर्थिक फायद्याकरिता दुप्पट दराने किराणा मालाची विक्री करत होते. त्यांनी खोबऱ्याची विक्री प्रतिकिलो 260 रुपये या दराने केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध येथे असणाऱ्या जय हिंद सुपर मार्केटचे दुकानदार रमेश हे शेंगदाणा, गुळ, तूरडाळ यांची चढ्या दराने विक्री करत होते. याप्रकरणी त्यांच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, गणेश पवार, भालचंद्र बोरकर, पोलीस नाईक दत्तात्रय फुलसुंदर, गणेश काळे, सागर घोरपडे, रमेश राठोड, विशाल शिर्के, अतुल मेंगे, सुहास कदम यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस