क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईने जीवन संपवल्याचं उघड, पोलिसांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 21:39 IST2024-10-04T21:38:30+5:302024-10-04T21:39:05+5:30
Salil Ankola's Mother Death: प्रभात रोड येथे राहणाऱ्या क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईने स्वत:चा गळा चिरून घेत आत्महत्या केली. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. माला अशोक अंकोला (७७, रा. प्रभात रोड), असे त्यांचे नाव आहे.

क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईने जीवन संपवल्याचं उघड, पोलिसांनी दिली माहिती
पुणे - प्रभात रोड येथे राहणाऱ्या क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईने स्वत:चा गळा चिरून घेत आत्महत्या केली. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. माला अशोक अंकोला (७७, रा. प्रभात रोड), असे त्यांचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माला अंकोला या एकट्याच राहतात. शुक्रवारी (दि. ४) सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या घरी काम करणारी महिला आली. त्यांच्या रूमचा दरवाजा बंद होता. त्यांनी बराच वेळा आवाज दिला तरी, आतून दरवाजा उघडली नाही. तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. तेव्हा माला अंकोला या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. माला अंकोला यांनी स्वत:च गळा चिरून घेतल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. डेक्कन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू असल्याचे डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी सांगितले.