शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सर्जनशीलता म्हणजे मनमानी नव्हे : डाॅ. प्रभा अत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 20:50 IST

गानवर्धन संस्था आणि शारंग नातू प्रणित तात्यासाहेब नातू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार यावर्षी जयपूर अत्रौली घराण्याच्या विख्यात गायिका व संगीत गुरू पंडित डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

पुणे : संगीताच्या नियमांच्या चौकटीत राहूनच मुक्त होता आले पाहिजे, तीच सर्जनशीलतेची वाट असते. सर्जनशीलता म्हणजे मनमानी नव्हे, असे सांगत, ‘आमच्या घराण्यात आहे तेच बरोबर, अशा भूमिकेमुळे शास्त्रीय संगीताच्या राग-रुपांमध्ये आज एकवाक्यता राहिलेली नाही. विरोध करणे, गोंधळ निर्माण करण्याचेच काम आज सुरु आहे. आपल्या ज्ञानाच्या पलीकडे संगीत शास्त्रात काही घडू शकते, हे त्यांना उमगतच नाही, अशा शब्दांत किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका यांनी शास्त्रीय संगीतातील सद्यस्थितीवर नेमकपेणाने बोट ठेवले.  निदान संगीतकलेच्या विकासासाठी त्यांनी एकत्र यायला हवे. मानकीकरणासाठी पाऊल उचलायला हवे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

    गानवर्धन संस्था आणि शारंग नातू प्रणित तात्यासाहेब नातू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार यावर्षी जयपूर अत्रौली घराण्याच्या विख्यात गायिका व संगीत गुरू पंडित डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.  किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते रविवारी टिळक स्मारक मंदिरात पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, मेवाती घराण्याचे गायक पं. संजीव अभ्यंकर, लता मराठे, शारंग नातू, प्रसाद भडसावळे उपस्थित होते. पुरस्कारानंतर पं.डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांची गायन मैफिल रंगली.

    प्रभा अत्रे म्हणाल्या, ‘संगीताचे प्रस्तुतीकरण आणि शास्त्र यांचे नाते बिंब-प्रतिबिंबासारखे असते. या नात्यात आज दुरावा निर्माण झाला आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, झपाट्याने बदलणारी जीवनपध्दती, राजकीय अस्थिरता, सामाजिक उदासिनता, निष्क्रियता, बाहेरचे सांस्कृतिक आक्रमण या परिस्थितीत शास्त्रीय संगीत जपणे, जिवंत ठेवण्याचे आव्हान आजच्या कलाकारांसमोर आहे. एका व्यापक दृष्टीकोनातून प्रस्तुतीकरण आणि शास्त्राचा अभ्यास होणे, ही आजच्या काळाची गरज आहे. भारतीय संगीताने जागतिक मंचावर निर्माण केलेले स्थान बळकट करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलायला हवीत. पुढची पिढी या दृष्टीने विचार करेल, अशी आशा वाटते.

 सृजनात्मकतेने जपला  सांगितिक वारसाआमच्या पिढीने ज्यांच्याकडे पथदर्शक म्हणून पहिले, त्या प्रभाताई ८७ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. ८७ वर्षांचे आयुष्य मिळाले, तर कसे जगावे याचा आदर्श आमच्या पिढीने त्यांच्याकडून घ्यायला हवा. किराणा घराण्याच्या सांगितिक वारसा त्यांनी सृजनात्मकतेने जपला आहे. मी शाळकरी मुलगी असताना त्यांचा संगीतातील बहराचा काळ होता. प्रभाताई, किशोरीताई, शोभाताई अशा मोजक्याच स्त्री गायिकांना मी फॉलो करत होते. मी प्रभातार्इंकडे शिकायला जावे, अशी आईची इच्छा होती. जयपूर घराण्याशी माझे धागे जुळल्याने माझे आणि प्रभातार्इंचे ॠणानुबंध जुळले नाहीत. गुरुंनी दिलेल्या संगीताच्या संस्कारांचा तर्कसुसंगती, कलासक्ती आणि बुध्दीनिष्ठेने त्यांनी डोळस स्वीकार आणि संगोपन केले. त्यांनी कायम बुध्दीच्या कसोटीवर घासून कला जोपासली आणि शिष्यांकडे सुपूर्त केली. त्याच वाटेवरुन माझी वाटचाल व्हावी, एवढीच इच्छा आहे.- अश्विनी भिडे-देशपांडे

कला परस्पर पूरकचित्रकाराच्या दृष्टीतून चित्र अदृश्य संगीत असते आणि संगीतकाराच्या दृष्टीतून संगीत हे अमूर्त चित्र असते. संगीत आणि चित्रकलेचा अत्यंत जवळचा संबंध आपण समजून घ्यायला हवा. संगीत शास्त्राचा इतर कलांशी, विज्ञान-तंत्रज्ञानाशी जवळचा संबंध आहे. एकमेकांच्या मदतीनेच प्रत्येक कला पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असते. म्हणूनच, संगीताचा अभ्यास वेगवेगळया दृष्टीकोनातून होणे आवश्यक आहे. - प्रभा अत्रे

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्याcultureसांस्कृतिक