शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशासाठी पूर्व प्राथमिकच्या जागांची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 16:22 IST

प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची मोठी निराशा

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी सर्वाधिक ९७२ खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची नोंदणी शाळांनी अचानक बदललेल्या ‘एन्ट्री पॉईंट’ची पालकांना कल्पना नसल्याने त्यांची अडचण यंदा आरटीई प्रवेशाच्या १७,०५३ जागा उपलब्ध

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी अनेक शाळांनी इयत्ता पहिली हाच ‘एन्ट्री पॉईंट’ ठेवला आहे. परिणामी पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची मोठी निराशा झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळांचे '' एन्ट्री पॉईंट '' तपासून घ्यावेत, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी सर्वाधिक ९७२ खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये यंदा आरटीई प्रवेशाच्या १७,०५३ जागा उपलब्ध आहेत. त्यातील सुमारे ९३ टक्के शाळांनी नर्सरी व केजीस्तरावरचे प्रवेश नाकारले आहेत. आरईटी प्रवेशाच्या एकूण १७,०५३ पैकी १५,६३८ जागांवर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. परिणामी ३ ते ५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी शाळांमध्ये खूप कमी जागा उपलब्ध आहेत.आरईटी प्रवेशाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पालकांनी घराजवळील नर्सरी, केजी एन्ट्री पॉईंटच्या शाळांचा शोध घेतला. परंतु, अनेक पालकांना या शाळाच सापडल्या नाहीत. परिणामी ६ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच आरटीईच्या शाळांमध्ये प्रवेश अर्ज भरता येत आहे. त्यामुळे वर्षभर आरटीईअंतर्गत प्रवेश मिळण्याच्या आशेने दुसऱ्या कोणत्याही शाळेत पाल्याचा प्रवेश न केलेल्या पालकांची मोठी पंचाईत झाली आहे. तसेच शाळांनी अचानक बदललेल्या ‘एन्ट्री पॉईंट’ची पालकांना कल्पना नसल्याने त्यांची अडचण झाली आहे.सामान्यपणे खुल्या प्रवर्गातील व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे विद्यार्थी खासगी शाळांमध्ये नर्सरीपासून शिक्षण घेतात. त्यामुळे पहिलीत प्रवेश घेण्यापूर्वी त्यांचा बराच अभ्यास झालेला असतो. तसेच त्यांची काही कौशल्ये विकसित झालेली असतात. नर्सरीपासून शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांसोबत आरटीईअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना बसवल्यास या विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही मुले-मुली शैक्षणिक प्रगतीमध्ये मागे पडू शकतात.------------------------ केवळ आर्थिक परतावा द्यावा लागू नये, म्हणून राज्य शासन शाळांचा आरटीई प्रवेशाचा एन्ट्री पॉर्इंट पहिलीपासून करण्यास मान्यता देत आहे. त्यामुळे गरीब पालकांना खासगी नर्सरी, केजी, शिशुवर्गात भरमसाठ पैसे भरून प्रवेश घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे नर्सरी, केजी वर्ग संलग्न असणाºया सर्व शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश द्यावा. अन्यथा शिक्षणमंत्र्यांनी ३ ते ५ वयोगटातील मुला-मुलींना शिक्षणाचा हक्क लागू नसल्याचे जाहीर करावे.- मुकुंद कीर्दत, शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी, पुणे..........................         माझा मुलगा चार वर्षांचा असून त्याला आरटीईअंतर्गत प्रवेश मिळावा, यासाठी मी गेल्या वर्षापासून प्रयत्न करत आहे. परंतु, वडाचीवाडी या भागातील शाळांंनी आरटीई प्रवेशासाठी पूर्व प्राथमिकचे वर्गच दाखविले नाहीत. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. - सोनी राठोड, पालक, वडाचीवाडी ---------------

           

टॅग्स :PuneपुणेRight To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थीSchoolशाळा