to create interest of language in children, parent should take books in hand : aruna dhere | मुलांना भाषेची गाेडी लावण्यासाठी आधी पालकांनी पुस्तक हातात घ्या : अरुणा ढेरे
मुलांना भाषेची गाेडी लावण्यासाठी आधी पालकांनी पुस्तक हातात घ्या : अरुणा ढेरे

पुणे : शिक्षक व पालकांसाठी साहित्य व मराठी भाषा हे जिव्हाळ्याचे विषय हवेत. पालक मुलांसमोर हातात मोबाईल घेऊन बसल्यास मुलंही त्यातच रमतील. मुलांना भाषेची गोडी लावायची असल्यास आधी पालकांनी हातात पुस्तक घ्यायला हवे. भाषा, साहित्याविषयी मुलांशी संवाद साधायला हवा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे यांनी पालकांना केले.

विवेक समुह, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, टी. बी. मुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन आणि शिक्षणविवेक यांच्या वतीने आयोजित ‘शिक्षण माझा वसा’ या कार्यक्रमात रविवारी डॉ. ढेरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले,  माजी खासदार प्रदीप रावत, फाऊंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. किशोर लुल्ला, सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुध्दे, माजी प्राचार्य डॉ. अनिरूध्द देशपांडे, नितीन शेटे, साप्ताहिक विकेच्या संपादक अश्विनी मयेकर, शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादिका डॉ. अर्चना कुडतरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये उपक्रमशील शिक्षक व मुख्याध्यापकांना राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

डॉ. ढेरे म्हणाल्या, मराठी शाळा, मराठी भाषा जिवंत राहावी यासाठी शासनाने, शिक्षकांनी प्रयत्न करावेत, अशी सगळ््यांची अपेक्षा असते. पण एक सामान्य माणूस, पालक म्हणून आपण आपल्या भाषेवर किती प्रेम करतो. या भाषेमध्ये किती बोलतो, किती वापर करतो? याचाही विचार करायला हवा. सर्वांनीच आपल्या भाषेकडे जागृतपणे पाहण्याची गरज आहे. प्रादेशिक भाषा वर्ष केवळ साजरे करून चालणार नाही. मुलांना भाषेची गोडी लावायची असेल तर पालक आणि शिक्षकांची भुमिका महत्वाची आहे. भाषेकडे जाणिवपुर्वक पाहायला हवे. पालकांनी पुस्तक हातात घेतले, मुलांशी संवाद साधला तर त्यांनाही गोडी लागले. त्यामुळे पालक व शिक्षकांनी मराठी भाषेकडे, बोली भाषांकडे प्रेमाने, जागृतपणे पाहणे आवश्यक आहे. शिक्षक, पालक विद्यार्थ्यांमध्ये समन्वय असायला हवा. आपण समाजासाठी जेवढे करून तेवढे कमीच आहे. पण हे कार्य करत असताना आपले पाय नेहमी जमीनीवर हवेत, अशी अपेक्षा गोखले यांनी व्यक्त केली. डॉ. कुडतरकर यांनी प्रास्ताविक केले. लुल्ला यांनी संस्थेविषयी माहिती दिली.

Web Title: to create interest of language in children, parent should take books in hand : aruna dhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.