क्रेन अपघाताचा अहवाल दोन दिवसांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:34 IST2017-11-24T00:34:23+5:302017-11-24T00:34:35+5:30
नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या घडलेल्या दुर्घटनेतील कारणांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी पुण्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील तीन जणांच्या तज्ज्ञ समितीमार्फत प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या क्रेनची आणि संबंधित अधिकाºयांची अपघातप्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली.

क्रेन अपघाताचा अहवाल दोन दिवसांत
अकोले : नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या घडलेल्या दुर्घटनेतील कारणांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी पुण्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील तीन जणांच्या तज्ज्ञ समितीमार्फत प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या क्रेनची आणि संबंधित अधिकाºयांची अपघातप्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली.
या वेळी केलेल्या चौकशीचा अहवाल दोन दिवसांत भिगवण पोलिसांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. निंबाळकर यांनी दिली. अकोले (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये सोमवारी (दि. २०) अपघात होऊन ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. बोगद्याचे काम सोमा एंटरप्राईजेस कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे. दुर्घटनेनंतर कंपनीच्या चार कर्मचाºाांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तपासी अधिकारी भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञ समितीस घटनास्थळाची पाहणी करून याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व सिव्हिल विभागाच्या विभागप्रमुखांनी गुरुवारी (ता.२३) दुपारी घटनास्थळी भेट दिली.
यामध्ये कामाच्या ठिकाणी असलेली यंत्रसामग्री किती कालावधीची असून, ती वापरण्यायोग्य होती का? त्या मशिनरीची वेळोवेळी देखभाल करण्यात आली होती का? तसेच बोगद्याची रचना, बांधकाम, क्रेनची क्षमता, क्रेनचे वायररोप, बोगद्यामध्ये सुरक्षेच्या साधनांची स्थिती, याबाबतची माहिती घेतली.