कोव्हिशिल्ड’ ट्रेडमार्कबाबतचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:18 IST2021-02-05T05:18:43+5:302021-02-05T05:18:43+5:30
पुणे: ‘सिरम’ निर्मित करीत असलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या लशीच्या ट्रेडमार्क वापरावर हरकत घेत नांदेड येथील ‘क्युटीस बायोटीक’ या कंपनीने ...

कोव्हिशिल्ड’ ट्रेडमार्कबाबतचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
पुणे: ‘सिरम’ निर्मित करीत असलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या लशीच्या ट्रेडमार्क वापरावर हरकत घेत नांदेड येथील ‘क्युटीस बायोटीक’ या कंपनीने येथील न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यातील अर्ज न्यायालयाने शनिवारी फेटाळला. ‘सिरमे’ ने ‘कोव्हिशिल्ड’ नावाचा वापर थांबविण्याबाबत तात्पुरता मनाई आदेश देण्याची मागणी करणारा अर्ज या कंपनीने केला होता.
सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांच्या न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. ‘कोव्हिशिल्ड’ या ट्रेडमार्कचा वापर करण्यास आम्ही ‘सिरम’च्या आधी सुरूवात केली आहे. त्यामुळे ‘सिरम’ने लशीचे नाव बदलावे, अशी मागणी करणारा दावा क्युटीस बायोटीक'' कंपनीने येथील जिल्हा न्यायालयात केला आहे. सिरमच्यावतीने ॲड. सुनीता किणकर, ॲड. हितेश जैन, ॲड. श्रीकांत देशपांडे, ॲड. पूजा तिडके यांनी बाजू मांडली.
क्युटीस बायोटीकला प्रथमदर्शनी स्वामित्व सिद्ध करता आलं नाही. बिलाच्या दोन पावत्या आणि नोंदणीसाठी आधी अर्ज केला म्हणून ट्रेडमार्कखाली हक्क मिळत नाहीत. अर्जदार यांनी अद्याप लस तयार केलेली नाही. त्यामुळे लशीच्या नावावरून ग्राहकांमध्ये कोणताही गोंधळ होणार नाही. तसेच पासिंग आॅफचे उल्लंघन होणार नाही. नावाचा वापर थांबविल्यास ‘सिरम’चे मोठे नुकसान होणार आहे. कारण केंद्र सरकारसह काही देशांनी लस घेतली आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
........