महेश राऊतला पदविका घेण्यास न्यायालयाची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 22:02 IST2019-04-04T22:02:01+5:302019-04-04T22:02:59+5:30
बंदी असलेल्या संघटनेशी (माओवादी) संबंधित असल्याच्या कारणावरून सध्या कारागृहात असणार्या महेश राऊत याला इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्तविद्यापीठात पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. विशेष न्यायाधिश किशोर वढणे यांच्या न्यायालयाने ही परवानगी दिली आहे.

महेश राऊतला पदविका घेण्यास न्यायालयाची परवानगी
पुणे : बंदी असलेल्या संघटनेशी (माओवादी) संबंधित असल्याच्या कारणावरून सध्या कारागृहात असणार्या महेश राऊत याला इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्तविद्यापीठात पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. विशेष न्यायाधिश किशोर वढणे यांच्या न्यायालयाने ही परवानगी दिली आहे.
माओवादी प्रकरणाची विशेष न्यायाधिश किशोर वढणे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. महेश राऊत याने कारागृहात असताना इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्तविद्यापीठातूनमानवाधिकार आणि गांधी विचार या विषयात पदविकेला (डिप्लोमा) प्रवेश घेता यावा यासाठी अर्ज केला होता. मात्र राऊत हो कोरेगाव भिमा सारख्या संवेदनशिल खटल्यातील संशयित आरोपी असून खटला सुरू असणार्या इतरांना
मन, सोबत संपर्क येवू नये म्हणून पदविका करण्यासाठी परवानगी नाकारण्यात यावी असे मत कारागृह प्रशासनाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले, 21 जानेवारी पासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्तविद्यापीठाचे एक केंद्र येरवडा कारागृहात सुरू करण्यात आले आहे. पदविकेचा अभ्यासक्रम असल्याने तासांना हजेरी लावण्याची गरज नाही. मुक्तविद्यापीठात मानवाधिकार आणि गांधी विचार पदविकेसाठी प्रवेश घ्यायचा, पुस्तके मिळतील व त्यानंतर परिक्षाकेंद्रामध्ये जावून परिक्षा दायची आहे. यामुळे या पदविकेसाठी राऊत यांना परवागी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. महेश राऊत व इतर जणांच्या जामिनावर 8 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.