शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या भांडणामुळे पतीच्या मागणीनुसार पत्नीला स्वतंत्र राहाण्याचे न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 17:05 IST

आदेशात पत्नीला वेगळे घर द्यावे व त्याचे दरमहा भाडे नमूद

ठळक मुद्देसततच्या वादामुळे पत्नीला स्वतंत्र राहण्याचे आदेश

पुणे : सततच्या भांडणाला कंटाळून पतीने पत्नीला स्वतंत्र राहाण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारा अर्ज  न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने पतीची मागणी मान्य करीत पत्नीला स्वतंत्र राहाण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पत्नीला वेगळे घर द्यावे व त्याचे दरमहा भाडे पतीने भरावे, असे न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

राजन आणि रागिणी  (दोघांची नावे बदलेली आहेत) यांचा विवाह २०१७ साली झाला. मात्र, घरामध्ये सतत होणारे वाद, सासू-सास-यांबरोबर सतत उडणारे खटके यामुळे  रागिणीने २०१९ साली कौटुंबिक हिंसाचारा बाबत पती, सासू-सा-यांविरोधात खटला दाखल केला. यावेळी अंतरिम पोटगी म्हणून दरमहा ५० हजार रुपये देण्यात यावे. तसेच कायमस्वरुपी म्हणून १ कोटी रुपये देण्यात यावे, अशी मागणी केली होती. न्यायालयाने या प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेत पत्नीला दरमहा ४ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला. या कारणावरून तिने सासू-सास-यांशी वाद घालून त्यांच्या विरुद्ध कलम ४९८ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यामुळे पतीने अ‍ॅड. पुष्कर पाटील, अ‍ॅड. रेश्मा सोनार यांच्यातर्फे न्यायालयात अर्ज करत पत्नीला वेगळे राहण्याचा आदेश करावा, अशी मागणी केली. दरम्यान पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे. पती-पत्नी व सासू-सासरे यांच्यामध्ये होणा-या सततच्या वादामुळे आणि भविष्याच अजून अडचणी वाढू नये म्हणून न्यायालयाने पतीचा अर्ज मंजूर करत पत्नीला स्वतंत्र राहण्याचे आदेश दिला आहे.

 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयOrder orderआदेश केणे