शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात परतलेल्या पत्नीला १ लाख रुपये अंतरिम खर्च द्या; अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या पतीला कोर्टाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 20:51 IST

न्यायालयाच्या निर्णयामुळे हे स्पष्ट झाले आहे की, परदेशात अत्याचार झाला असला तरीही भारतीय न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल करता येते

पुणे : कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा, २००५ केवळ भारतात राहणाऱ्या नागरिकांपुरता मर्यादित नाही. परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलांना, ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया (ओसीआय ) कार्डधारकांना आणि भारतात तात्पुरते वास्तव्य करणाऱ्या विदेशी महिलांना देखील या कायद्यांतर्गत संरक्षण मिळू शकते, असे नमूद करीत पुण्याच्या न्यायालयाने भारतात परतलेल्या पत्नीला अंतरिम १ लाख रुपये अंतरिम खर्च देण्याचे आदेश अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या पतीला दिले. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी. ए. ए. पांडे यांनी हा निकाल दिला.

स्मिता आणि राकेश ( नावे बदललेली) या पती-पत्नीला एक मुलगा आहे. राकेश आणि अल्पवयीन मुलगा हे दोघेही अमेरिकेचे नागरिक आहेत. भारतात येण्यापूर्वी स्मिता, राकेश व मुलासह अमेरिकेत राहात होती. स्मिता भारतात परत आली. तिने पुण्यात आल्यावर पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. पत्नीच्या वतीने न्यायालयात अॅड. मयूर साळुंके, अॅड. अजिंक्य साळुंके, अॅड. अमोल खोब्रागडे आणि अॅड. पल्लवी साळुंके यांनी बाजू मांडली.

पतीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की अत्याचार अमेरिकेत झाला असल्यामुळे भारतीय न्यायालयाचे हे कार्यक्षेत्र येत नाही. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला. दरम्यान, पतीने खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचा दावा केला, परंतु न्यायालयाने तो संशयास्पद मानला. पत्नी सुशिक्षित असूनही, तिने अमेरिकेत ११ वर्षे कुटुंबासाठी समर्पित केली आणि सध्या ती जवळपास ५० वर्षांची आहे. तिला लगेच नोकरी मिळेल अशी अपेक्षा करणे योग्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने पतीचे मासिक उत्पन्न ८ ते ९ लाख असल्याचे लक्षात घेऊन, त्याच्या आर्थिक अडचणीच्या दाव्यांना फेटाळून लावले आणि पत्नीला आर्थिक आधार देणे हे कायदेशीर तसेच नैतिक कर्तव्य असल्याचे अधोरेखित करीत पत्नीला दरमहा १ लाख रुपये अंतरिम देखभाल खर्च देण्याचे आदेश दिले. तसेच न्यायालयाने पुण्यातील संयुक्त घरात पत्नीला राहण्याचा अधिकारही संरक्षित केला, आणि पतीला त्या घरातून तिला बाहेर काढण्यास किंवा तृतीय पक्षाचे हक्क निर्माण करण्यास मनाई केली. या निर्णयात न्यायालयाने उत्पन्न मिळवण्याची क्षमता आणि प्रत्यक्ष उत्पन्न यामध्ये फरक असतो आणि गेल्या दशकभर गृहिणी म्हणून राहिलेल्या पत्नीच्या देखभालीची जबाबदारी पतीवरच आहे, हे ठामपणे अधोरेखित केले

न्यायालयाच्या निर्णयामुळे हे स्पष्ट झाले आहे की परदेशात अत्याचार झाला असला तरीही भारतीय न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल करता येते. हा अत्यंत सकारात्मक निर्णय आहे, कारण यामुळे भारतीय महिलांना भारतात परत येऊन कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा, २००५ अंतर्गत न्याय मागता येतो. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा केवळ भारतीय नागरिकांपुरता मर्यादित नाही. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया (ओसीआय ) आणि भारतात तात्पुरते वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींनाही या कायद्यांतर्गत दिलासा मागण्याचा अधिकार आहे- अॅड. अजिंक्य साळुंके व अॅड. मयूर साळुंके,, पत्नीचे वकील

टॅग्स :PuneपुणेAmericaअमेरिकाCourtन्यायालयMONEYपैसाhusband and wifeपती- जोडीदारFamilyपरिवार