नगदवाडीत हायस्पीड रेल्वेची मोजणी प्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:19+5:302021-07-24T04:09:19+5:30

नगदवाडी येथील ४७ शेतकऱ्यांची ४ हेक्टर ८३ आर क्षेत्र या रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार आहे. या मोजणीची प्रक्रिया ...

Counting process of high speed railway at Nagadwadi completed | नगदवाडीत हायस्पीड रेल्वेची मोजणी प्रक्रिया पूर्ण

नगदवाडीत हायस्पीड रेल्वेची मोजणी प्रक्रिया पूर्ण

Next

नगदवाडी येथील ४७ शेतकऱ्यांची ४ हेक्टर ८३ आर क्षेत्र या रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार आहे. या मोजणीची प्रक्रिया प्रांतआधिकारी सारंग कोडलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महारेलचे उपमहाव्यवस्थापक शिरोळे, व्यवस्थापक मंदार विचारे, महारेलचे समन्वयक चंद्रकिशोर भोर, मोजणी अधिकारी दत्तात्रेय पोटकुले, मंडलाधिकारी राजेश ढुबे नगदवाडीचे तलाठी अमर खसाळे, कांदळीचे सरपंच विक्रम भोर, ग्रामसेवक व्ही.व्ही. मुळूक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिन माने, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आकाश लांडगे, तुषार मंडलिक कृषी विभागाचे मंडलाधिकारी पि. डी. बनकर, पुष्पलता बांबळे जुन्नर वनविभागाचे कर्मचारी या सर्वांच्या एकत्रित सहभागाने ही मोजणी प्रक्रिया पार पडली.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून एकूण २३५ किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग पुणे, नाशिक व अहमदनगर या तीन जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यामुळे येथील कृषी, पर्यटन, व्यापार याबाबत येथील विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे.

नगदवाडी येथील शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्या महारेलच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. यावर चर्चा होऊन शेतकऱ्यांनी मोजणी प्रक्रियेला मंजुरी दिली या प्रकल्पात नगदवाडीतील ४७ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार असून १ हजार ३०० मीटर लांबीमध्ये २ शेतकऱ्यांची घरे, कांदाचाळ, ८ विहिरी ३ बोअरवेल, फळबागांचे नुकसान होणार आहे. बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न शासन दरबारी करणार असल्याचे महारेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

--

संपादननानंतर जमिनी जिरायती होणार

या रेल्वे प्रकल्पासाठी नगदवाडी येथील आठ विहिरी व तीन बोरवेल हे संपादित जमिनीत जात असल्याने बाधित शेतकऱ्यांना जलसिंचनाची मोठी समस्या निर्माण होणार आहे. या विहिरी व बोअरवेल वरच पिण्याच्या पाण्याची या भागातील शेतकऱ्यांची व्यवस्था आहे. विहिरीवरून शेतकऱ्यांनी कर्ज काढून दूरवर पाईपलाईन केलेल्या आहेत. विहिरीची जागा संपादित केल्यानंतर या पाईपलाईन निष्क्रिय ठरणार असल्याने शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक तोटा होणार आहे. संपादित क्षेत्रात जरी विहिरी आल्या तरी त्या बाबत विचार करून शेतकऱ्यांना या जलस्त्रोताचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल यासाठी महारेल ने दक्षता घ्यावी अशी विनंती या परिसरातील शेतकऱ्यांनी केली.

--

चौकट २

अनेक शेतकरी अत्यल्पभूधारक होणार

परिसरामध्ये यापूर्वी शासनाने कुकडी प्रकल्प, रेडिओ दुर्बीण यासारख्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन केले आहेत. अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यात रेल्वे प्रकल्पाला जमीन संपादित केल्याने अनेक जण अत्यल्पभूधारक होणार आहेत.

--

चौकट ३

पाइपलाइनची समस्या मोठी

--

नगदवाडी, वडगाव कांदळी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीसिंचन हे उपसा जलसिंचन योजनेवर अवलंबून आहे. कुकडी नदीवरून शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून शेतीसाठी पाणी पुरवठा योजना केल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पाईपलाईनचे क्रॉसिंग हे महारेलने संपादित केलेल्या जमिनीत होणार असल्याने महारेलने या पाईपलाईनसाठी योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Web Title: Counting process of high speed railway at Nagadwadi completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.