शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसचिव करू शकतात शासनाविरोधात दावा

By admin | Updated: April 3, 2015 03:30 IST

जुन्या शहराचा विकास आराखडा राज्य शासनाने काढून घेतल्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने प्रशासनाने राज्य शासनाच्या विरोधात न्यायालयात दा

पुणे : जुन्या शहराचा विकास आराखडा राज्य शासनाने काढून घेतल्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने प्रशासनाने राज्य शासनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागावी, असा प्रस्ताव मंजूर केला होता. महापालिका आयुक्त हे शासननियुक्त अधिकारी असल्याने त्यांना शासनाविरोधात न्यायालयात जाता येणार नसल्याची अडचण दूर झाली आहे. हा दावा कोणाला दाखल करता येईल, याबाबत महापालिका प्रशासनाच्या विधी विभागाने दिलेल्या अहवालानुसार, महापालिकेकडून नगरसचिवांना दावा दाखल करता येणे शक्य असल्याचा अभिप्राय देण्यात आला आहे. राज्य शासनाने जुन्या शहराचा विकास आराखडा ताब्यात घेत असल्याचे २७ मार्चला जाहीर केले. महापालिकेमध्ये आराखडा मंजूर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना राज्यशासनाने तो बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतला. महापालिकेच्या मूलभूत अधिकारावर गदा आणल्याप्रकरणी प्रशासनाने राज्य शासनाविरोधात न्यायालयात दाद मागावी, असा प्रस्ताव ८७ विरुद्ध १७ मतांनी ३० मार्चला सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. परंतु प्रशासन म्हणजे नेमके कोणाला राज्य शासनाविरोधात न्यायालयात जायचे? असे कोडे प्रशासनाला पडले होते. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हे शासननियुक्त अधिकारी असल्याने कायदेशीररीत्या त्यांना शासनाविरोधात महापालिका प्रशासन म्हणून न्यायालयात जाता येणार नाही. तसेच राज्यशासनाने आराखडा ताब्यात घेतल्यानंतर त्यावर पुढील निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या समितीत पालिका आयुक्तही असल्याने एकीकडे तेच डीपी करणार आणि दुसरीकडे तेच न्यायालयातही जाणार त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होईल. त्यामुळे नगरसचिव आणि मुख्य लेखापाल ही दोन पदे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने नियुक्त केलेली आहेत. तसेच हे दोन्ही विभाग आयुक्तांच्या नियंत्रणाखाली न येता स्वतंत्र आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाची चांगलीच अडचण झाली होती. मात्र, विधी विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार, ही अडचण सुटली असून, आता नगरसचिवांच्या माध्यमातून राज्यशासनाच्या विरोधात दावा दाखल करणे शक्य असल्याचा अभिप्राय प्रशासनाने दिला असल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्या अभिप्रायानुसार, नगरसचिव हे मुख्य सभेचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांना न्यायालयात जाणे शक्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)