पुणे : घरगुती वादातून जाब विचारण्यासाठी आलेल्यांना पत्नीसह तिघांवर कोयत्याने वार करुन त्यांना जबर जखमी करण्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजता टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयासमोर घडली़.या घटनेत मजू नरकटे, सीमा करण शिंदे आणि दत्तात्रय ढोमसे (रा़ अपर इंदिरानगर) हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम असे संशयित आरोपीचे नाव आहे़.तो मजूचा पती आहे़ . तो टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयासमोरील एका कंपनीत कामाला आहे़. गुरुवारी सकाळी शांताराम आणि मजू यांच्यात घरगुती वाद झाला होता़. त्यावेळी त्यांच्यात जोरदार भांडणे झाली़. याची माहिती सीमा व दत्तात्रय यांना समजल्यावर ते जाब विचारण्यासाठी तिघे सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याच्याकडे आले होते़. त्यावेळी झालेल्या बोलाचालीत शांतारामाने आपल्याकडील कोयत्याने तिघांवर वार करुन त्यांना जखमी केले़. त्यानंतर तो पळून गेला़. या घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस घटनास्थळी पोहचले असून शांतारामचा शोध घेण्यास पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे़.़़़़़़़़़़़़़
घरगुती वादातून पत्नीसह कोयत्याने तिघांवर वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 20:48 IST
घरगुती वादातून जाब विचारण्यासाठी आलेल्यांना पत्नीसह तिघांवर कोयत्याने वार करुन त्यांना जबर जखमी करण्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजता टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयासमोर घडली़.
घरगुती वादातून पत्नीसह कोयत्याने तिघांवर वार
ठळक मुद्देटिळक रोडवर भर दिवसा खळबळजनक घटना, आरोपी फरार