शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
4
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
5
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
6
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
7
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
8
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
9
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
10
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
11
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
12
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
13
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
14
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
15
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
16
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
17
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
18
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
19
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
20
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले

धनकवडी येथील मोक्याच्या जागेवरील आरक्षण उठविण्याचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 11:33 IST

धनकवडी येथील ओटा मार्केट आणि पोलीस चौकीसाठी आरक्षित असलेल्या मोक्याच्या जागेवारील आरक्षण उठविण्यासाठीचा घाट महापालिकेने घातला आहे.

ठळक मुद्दे शासनातील मंत्री आणि स्थायी समितीचा पुढाकार

पुणे : धनकवडी येथील ओटा मार्केट आणि पोलीस चौकीसाठी आरक्षित असलेल्या मोक्याच्या जागेवारील आरक्षण उठविण्यासाठीचा घाट महापालिकेने घातला आहे. यासाठी राज्य शासनातील एक मंत्री आणि स्थायी समितीने पुढाकार घेतला असल्याचा आरोप नगरसेवक विशाल तांबे यांनी केला आहे. या प्रकरणामध्ये आयुक्तांनी हस्तक्षेप करून स्थायी समिती समोरील हा प्रस्ताव आपल्या अधिकारामध्ये सर्वसाधारण सभेत ठेवावा अशी मागणी देखील तांबे यांनी केली.     याबाबत नगरसेवक विशाल तांबे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, धनकवडी - चैतन्यनगर येथील स.न. २९ येथे २००४ च्या विकास आराखड्यामध्ये ओटा मार्केट आणि पोलीस चौकीसाठी आरक्षण टाकले आहे. सातारा रस्त्या लगत असलेल्या जागेचा सातबारा हा पी. बी. कदम यांच्या नावे असून,  इतर अधिकारामध्ये प्रवीण उत्तमराव भिंताडे यांचे नाव आहे. प्रवीण भिंताडे हे गणेश भिंताडे या नावाने परिचित असून ते बांधकाम व्यावसायिक आणि भाजपचे पदाधिकारी आहेत. सन २०१७ मध्ये त्यांनी धनकवडी येथून भाजपकडून निवडणूकही लढवली आहे.         आरक्षित जागेवर ओटा मार्केट आणि पोलीस चौकी सुरू करावी यासाठी गेली अनेक वर्षे मी पाठपुरावा करत आहे. अगदी महापालिकेपासून मुख्यमंत्री कार्यालयाकडेही पाठपुरावा केला आहे. दरम्यान, भिंताडे यांनी महापालिकेने भूसंपादन केले नसल्याने जागा मूळ मालकांना परत द्यावी यासाठी शासनाकडे अर्ज केला. शासनाने यावर हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्यावर मी आणि महापालिकेने हरकत नोंदवली होती. मात्र नगरविकास विभागाने यावरील सूनवणीला मला बोलवले नाही.   यावर्षी १ मार्चला  शासनाने धनकवडीकरांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करून भिंताडे यांची खरेदी सूचना नोटीस मान्य केली.  विशेष की डिसेंबर २०१८ मध्ये भिंताडे यांनी अर्जासोबत कोणतेही कागदपत्र जोडलेली नसल्याने त्यांची खरेदी सूचना फेटाळण्यात आली होती.     शासनाने याबाबत १ मार्च रोजीच आदेश दिला, परंतु महापालिकेला तो थेट २७ मार्च रोजी मिळाला. त्यानंतर भिंताडे यांनी खरेदीची सूचना मान्य झाल्याने पाठपुरावा करुन आयुक्तांनी आरक्षित जागा संपादीत करण्यासाठी ६ मे रोजी प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला. परंतु आता आता बिल्डारासाठी आरक्षण उठविण्याचा घाट घातला आहे.       हा आरक्षित भूखंड मेट्रो क्वारिडॉर मध्ये येतो. त्याला चार एफएसआय मिळणार आहे. त्यामुळे या जागेची किंमत २०० कोटी होणार आहे. त्यामुळे यातून मिळणारी मलई खाण्यासाठी सत्तेतील बोके सरसावले आहेत, असा आरोप देखील तांबे यांनी केला. अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा यांना याबद्दल निवेदन दिले असून , ६० दिवसांत समितीने निर्णय न घेतल्याने महापालिका अधिनियमानुसार हा आयुक्तांनी हा प्रस्ताव स्वत:च्या अधिकारात मंजूर करून सर्वसाधारण सभेपुढे मांडावा अशी मागणी केली आहे. याप्रसंगी नगरसेवक बाळा धनकवडे, नगरसेविका अश्विनी भागवत  उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMetroमेट्रो