चंदननगर - वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार सुनील टिंगरे यांना दोन दिवसांपासुन ताप येत होता व कणकण होती. त्यामुळे त्यांनी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.त्यांनी सदर माहिती त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट टाकून दिली. आज सकाळी वडगावशेरी मधील गणेशनगर येथे झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटाची पाहीण करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे आले होते.त्यांच्या सोबत नगरसेवक, अधिकारी व स्थानिक नागरिक घोळका करून बोलत होते. यावेळी कोणताही सोशलडिस्ट्न पाळला गेला नाही. त्यावेळी घटनास्थळी दोनशेहुन अधिक नागरी याठिकाणी होते.
coronavirus: वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरेंना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 23:57 IST