Coronavirus Pune : पुणे शहरात शनिवारी ६ हजार कोरोना रूग्णांची वाढ; ५,६०९ रुग्ण झाले बरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 20:40 IST2021-04-17T20:39:16+5:302021-04-17T20:40:00+5:30
शहरात १२३६ अत्यवस्थ, ५४ जणांचा मृत्यू

Coronavirus Pune : पुणे शहरात शनिवारी ६ हजार कोरोना रूग्णांची वाढ; ५,६०९ रुग्ण झाले बरे
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून शनिवारी दिवसभरात हा आकडा ६ हजार ६ रूग्णांनी वाढला. तर, दिवसभरात ५ हजार ६०९ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १२३६ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५४ हजार ९६७ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १२३६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ५ हजार ७१७ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ५६ झाली आहे. पुण्याबाहेरील २१ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरात एकूण ५ हजार ६०९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ९९ हजार ७८० झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ३ लाख ६० हजार ८०३ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५४ हजार ९६७ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २४ हजार ५०६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १८ लाख ५६ हजार ६६३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.