Coronavirus Pune : दिलासादायक! पुणे जिल्ह्यासाठी ४ हजार ३११ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा: डाॅ. राजेश देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 11:18 PM2021-04-16T23:18:24+5:302021-04-16T23:18:35+5:30

पुण्यासह संपूर्ण राज्यातच सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.

Coronavirus Pune: Comfortable! Supply of 4 thousand 311 remedicivir injections for Pune district: Dr. Rajesh Deshmukh | Coronavirus Pune : दिलासादायक! पुणे जिल्ह्यासाठी ४ हजार ३११ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा: डाॅ. राजेश देशमुख

Coronavirus Pune : दिलासादायक! पुणे जिल्ह्यासाठी ४ हजार ३११ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा: डाॅ. राजेश देशमुख

Next

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण करणाऱ्या पुणेकरांसाठी काहीशी दिलासादायक बातमी असून, शुक्रवारी पुण्यासाठी सुमारे ४ हजार ३११ रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला. दरम्यान पुण्यातील अनेक रुग्णांना शुक्रवारी  देखील दिवसभर रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नाही. यामुळेच पेशंटच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड नाराजी असून,  रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरुच आहे.  

पुणे जिल्ह्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी म्हणाले शुक्रवारी पुणे जिल्हा करतात ४ हजार ३११ इंजेक्शन आले आहेत. हे इंजेक्शन पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड आणि जिल्हा याठिकाणी ३०० हॉस्पिटला वाटप करण्यात आले आहेत. देशमुख दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत.

पुण्यासह संपूर्ण राज्यातच सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. परंतु पुण्यात दररोज वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी देखील मोठी आहे. बहुतेक सर्व हाॅस्पिटल पेशंटला रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्या अन्यथा आम्ही तुमच्या पेशंटची जबाबदारी घेणार नाही असे सांगून नातेवाईकांना भिती घालत आहेत , तर  काही ठिकाणी पेशंटला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज नसताना नातेवाईक आग्रह धरत आहे. यामुळेच सध्या पुण्यात आवश्यक तेवढी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने प्रचंड पॅनिक परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुण्यात प्रचंड वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात गंभीर रुग्ण देखील अधिक असल्याने रुग्णांना व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड आणि रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या संपूर्ण राज्यातच रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळेच प्रशासन पुण्याला जास्तीत जास्त रेमडेसिविर इंजेक्शन मिळावीत यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख यांनी दिली.

संबंधित कोविड रूग्णालयांनी त्यांचे नावाची लिस्ट दिलेली आहे. आलेल्या संख्येप्रमाणे व औषध पुरवठादार नुसार त्यांच्याकडून तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शन शासनाने निश्चित केलेल्या दराने प्राप्त करून घ्यावेत. याबाबत कोणतीही सबब चालणार नाही. कोणत्याही प्रकारची दिरंगाई टाळाटाळ, कसूर होणार नाही असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

संबंधित कोविड रूग्णालयांनी हा  औषध साठा प्राप्त करून घेण्याकामी रूग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्क्यानिशी प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण सदर आदेशाचे दिनांकास मुदतीत व शासकीय / वाजवी दरात करण्याचे आहे.

पुणे महानगरपालिका, पिंपरी महानगरपालिका, पुणे छावणी परिषद, पुणे गामीण, नगरपालिका) प्रशासन व नगर पंचायतसह आयुक्त औषध व प्रशासन, पुणे याबाबत संबंधित आरोग्य यंत्रणेचे प्राधिकृत आरोग्य अधिकारी यांनी सदर वितरण तक्त्यानुसार वाटप होत असलेची व सदर वितरीत औषधांचा उचित विनियोग होत असल्याची वेळोवेळी खातरजमा करून अनियमितता आढळली. संबंधितांवर कारवाई करावी असे त्यांनी सांगितले.

Web Title: Coronavirus Pune: Comfortable! Supply of 4 thousand 311 remedicivir injections for Pune district: Dr. Rajesh Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.