शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

Coronavirus positive news : ‘त्या’ आईच्या चेहऱ्यावरील 'वात्सल्या'ने दिली ऊर्जा;पुण्यातील ससूनच्या परिचारिकेचा रोमांचकारी अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 11:20 AM

दोन वर्षांच्या बाळासह उपचारासाठी दाखल झालेल्या एका आईला पाहिले आणि माझ्या मुलांचे चेहरे नजरेसमोर आले. त्या महिलेला धीर दिला..

ठळक मुद्देससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात केली कोरोनाबाधितांची सेवा

नारायण बडगुजर-पिंपरी : पोरींनो... हे खूप छान काम आहे, लय भारी सेवा करताय तुम्ही, असे कोरोनाग्रस्त वृद्ध महिला म्हणाली आणि ते मनाला भिडले. त्या महिलेला पाहून आईची आठवण झाली. तर दुसरीकडे दोन वर्षांच्या बाळासह उपचारासाठी दाखल झालेल्या एका आईला पाहिले आणि माझ्या मुलांचे चेहरे नजरेसमोर आले. त्या महिलेला धीर दिला. तिच्या मुलाचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे आनंदीत झालेल्या त्या आईच्या चेहऱ्यावरील 'वात्सल्य'आम्हाला 'नव ऊर्जा' देणारे ठरले. हे अनुभव कथन आहेत पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या कोरोना सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या एका परिचारिकेचे.अनिता मंगेश जांभळे (रा. साई मल्हार कॉलनी, तापकीर चौकाजवळ, काळेवाडी) असे परिचारिकेचे नाव आहे. अनिता यांचे पती मंगेश हे अभियंता असून एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांचा मोठा मुलगा ओम इयत्ता नववी, तर लहान मुलगा स्पर्श हा इयत्ता दुसरीत शिकत आहे. अनिता यांचे सासरे पद्माकर जांभळे हे वयोवृद्ध असून मधुमेह विकारांनी ते त्रस्त असतात. तसेच पडल्याने हाताला दुखापत झाल्याने सासू कल्पना यांना कोणतेही काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे एक गृहिणी म्हणून अनिता यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे.

ससून रुग्णालयात अनिता जांभळे परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कोरोनाबाधित रुग्ण दाखल करण्यात येतात. रोटेशननुसार या अतिदक्षता विभागात अनिता यांची आठ दिवसांसाठी ड्यूटी लागली. त्यामुळे त्यांना एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यावेळी घरच्यांचा निरोप घेताना त्यांना प्रत्येकांची चिंता वाटत होती. मात्र, कोरोना योद्धा असल्याने कर्तव्याची देखील जाण होती. त्याच जाणिवेतून त्यांनी कोरोना रुग्णांच्या सेवेचे व्रत आनंदाने स्वीकारले.अनिता त्याबाबत म्हणाल्या, कोरोनाची बाधा झालेले अतिगंभीर रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येतात. त्यामुळे या रुग्णांची देखभाल करताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यासाठी पीपीई किट परिधान करावे लागायचे. त्यानंतर सहा ते सात तास काहीही न खाता-पिता कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करायची. असा दिनक्रम होता. अतिदक्षता विभाग असल्याने तेथे काही रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या विभागात बहुतांश वेळा दु:खद वातावरण निर्माण झाले. याचा इतर काही रुग्णांना मानसिक त्रास झाला. मात्र, त्यांना धीर देत त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न केले. त्यासाठी खबरदारी घेत त्यांच्याशी संवाद साधला.
एक वयोवृद्ध महिलेने आमचे काम पाहिले. त्यांना श्वसनाचा त्रास होता. तरीही व्हेंटिलेटर बाजूला करून त्या आमच्याशी बोलल्या. पोरींनो... हे खूप छान काम आहे, लय भारी सेवा करताय तुम्ही, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे आईची आठवण झाली. मृत्यूशी झुंज सुरू आहे, तरीदेखील ती महिला आपल्या कामाचे कौतुक करतेय ही बाब मनाला भिडली. दरम्यान, त्याचवेळी एक चिमुकले बाळदेखील या विभागात दाखल झाले. त्यानंतर लगेचच दोन वर्षांचे मूलही दाखल झाले. चिमुकल्या बाळाचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र, दोन वर्षांच्या मुलाचे रिपोर्ट आले नाहीत. त्यामुळे त्याची आई रडत होती. माझ्या मुलाचे रिपोर्ट का नाही आले, काही झाले तर नाही ना, अशा अनेक शंकांनी तिचे मन चिंताग्रस्त होते. ते पाहून मलादेखील माझ्या मुलांचे चेहरे आठवले. मात्र, भावनिक होण्याची ती वेळ नव्हती. त्या महिलेला धीर दिला. तिची समजूत काढली. मुलाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तिच्यासह आमच्या सर्वांना आनंद झाला.

पीपीई किट उतरविणे अवघड...पीपीई किट परिधान करणे किचकट वाटते. मात्र, त्याहीपेक्षा ते अंगावरून काढायला अवघड आहे. कारण आपण थेट कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेलो असतो. अशावेळी विषाणू त्या किटवर असण्याची शक्यता असते. त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून किट उतरवताना खूप खबरदारी घ्यावी लागते, असे अनिता यांनी सांगितले.

स्वागताने भारावून गेले..आठ दिवस ड्यूटी केल्यानंतर आठ दिवस त्याच हॉटेलमध्ये क्वारंटाइन केले होते. कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी आले. त्यावेळी घरच्यांनी व परिसरातील नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. त्यामुळे भारावून गेले. दरम्यान, मुलांनी व पतीने माज्या सासूबाइंर्ना घरकामात मदत केली. १५ दिवस त्यांना कसरत करावी लागली. मात्र, त्यातही त्यांनी आनंद मानला, ही समाधानाची बाब आहे, असे अनिता यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsasoon hospitalससून हॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस