शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

Coronavirus : कोरोनाने पेट्रोल-डिझेलचा खप २३ लाख लिटरने घटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 22:00 IST

वाहनांची संख्या रोडावली : दुसऱ्यादिवशी बाजारपेठा बंद, पानविक्रेतेही सहभागी

ठळक मुद्देराज्यात साथ रोगप्रतिबंधक कायदा लागू शहरातील मध्यवर्ती पेठांमधील बाजारपेठा, हॉटेल आणि रेस्टॉरंट, पानटपऱ्या बुधवारी बंद शहरातील रस्त्यांवर दोन-तीन दिवस शुकशुकाट

 २३ लाख लिटरनी घटलाने पेट्रोवाहनांची संख्या रोडावली : दुसºया दिवशी बाजारपेठा बंद, पानविक्रेतेही सहभागीपुणे : कोरोना विषाणूच्या प्रसार रोखण्यासाठी शहरातील मध्यवर्ती पेठांमधील बाजारपेठा, हॉटेल आणि रेस्टॉरंट, पानटपऱ्या बुधवारी बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दोन-तीन दिवस शुकशुकाट दिसून येत आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या घटल्याने पेट्रोल-डिझेलचा खपही तब्बल ३० टक्क्यांनी (सुमारे २३ लाख लिटर) घटला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी राज्यात साथ रोगप्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा सोमवारपासून बंद करण्यात आल्या आहेत. पुणे व्यापारी असोसिएशनशी संलग्न ८२ संघटना यात सहभागी झाल्या आहेत. सराफ व्यावसायिक, कापड, इलेक्ट्रॉनिक, टिंबर मार्केट अशा विविध संघटनांनी कडकडीत बंद पाळला आहे. अन्नधान्य, भाजीपाला, दूध आणि औषध दुकाने वगळता इतर दुकाने बंदमधे सहभागी झाली आहेत. त्याचबरोबर हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारदेखील तीन दिवस बंद करण्याचा निर्णय मंगळवारी (दि. १७) घेण्यात आला. परिणामी, शहरातील बहुतांश हॉटेलही बुधवारी बंद होती. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, पेठांमधील खाऊगल्ल्यादेखील बंद होत्या. पान विक्रेत्यांपासून अमृततुल्यदेखील तुरळक अपवाद वगळता बंद ठेवण्यात आले.शाळा-महाविद्यालये ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश यापूर्वीच देण्यात आला आहे. त्यामुळे गेले काही दिवस शहरामधील वर्दळ कमी झाली आहे. बाहेरून शहरात येणाºया प्रवाशांची संख्यादेखील रोडावली आहे. त्याचा एकत्रित परिणाम इंधनाच्या विक्रीवर झाला आहे.याबाबत माहिती देताना पेट्रोल डीलर असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला म्हणाले, ‘‘रस्त्यावरील वाहनांची संख्या रोडावल्याने इंधनाची विक्री ३० टक्क्यांनी घटली आहे. शहरात दररोज ३० लाख लिटर पेट्रोलची विक्री होते. त्याचा खप २१-२२ लाख लिटरपर्यंत खाली आला आहे. तसेच, दररोज ६० लाख लिटर डिझेलचा खप होतो. त्यातही ४०-४५ लाख लिटरपर्यंत घट झाली आहे.पेट्रोल-डिझेल वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांमध्येदेखील रोगाबाबत जागृती करण्यात येत असल्याचे अली यांनी स्पष्ट केले. पेट्रोलचा प्रतिलिटर दर ७५.०६ आणि डिझेलचा ६३.९८ इतका आहे.

टॅग्स :PuneपुणेPetrolपेट्रोलtwo wheelerदुचाकीfour wheelerफोर व्हीलरpassengerप्रवासीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस