शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus News in Pune : बारामतीत आढळला १५वा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, लोणी भापकर गाव सील  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 11:24 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : बारामतीच्या ग्रामीण भागातील हा ७ वा  कोरोना बाधित रुग्ण आहे. बारामतीत एकूण संख्या आता  १५वर जाऊन पोहोचली आहे.

बारामती : बारामतीत १५वा कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण  ७० वर्षीय असून तो मुंबई घाटकोपर येथून १९ मे रोजी गावी आला होता. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबत माहिती दिली. त्याच्यावर बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

हा रुग्ण १९ मे रोजी त्याच्या घरी आला होता. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याची कोरोनाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्याला संसर्ग झाल्याचे आज मिळालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. बारामतीच्या ग्रामीण भागातील हा ७ वा  कोरोना बाधित रुग्ण आहे. बारामतीत एकूण संख्या आता  १५वर जाऊन पोहोचली आहे.

आजचा रुग्ण देखील मुंबईतून आला आहे. बारामती शहर कोरोना मुक्त करण्यात प्रशासनाला यश आले. मात्र , बाहेरून आलेल्या नागरिकामुळे बारामतीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे, तसेच ग्रामीण भागात कोरोना पसरत असल्याने स्थानिक नागरिक अडचणीत आल्याचे दिसत आहे .नागरीकांनी लॉकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी  बाहेर पडताना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटाझरचा वापर करणे  देखील महत्वाचे आहे.

लोणी भापकर गाव पूर्ण सील करण्यात आले  आहे .आसपास चे तीन किमी क्षेत्र बफर झोन घोषित करण्यात आला आहे. शहरात श्रीरामनगर, समर्थनगर म्हाडा वसाहत, कल्याणीनगर परिसरसह तालुक्यात माळेगाव, कटफळ, मुर्टी, वडगांव निंबाळकर येथे आजपर्यंत रुग्ण आढळले आहेत. कटफळ येथील रुग्णावरमुंबईत, तर माळेगाव, मुर्टी, वडगांव निंबाळकर, कल्याणीनगर येथील रुग्णावर देखिल बारामती येथे उपचार सुरू आहेत. पुणे मुंबई येथून गावी  येणाऱ्या  नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढतच आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBaramatiबारामती