CoronaVirus News : पुण्यात कोरोना मृत्युदर घटला, राज्याच्या तुलनेत घसरण; पॉझिटिव्हिटी रेटही झाला कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 01:16 AM2020-11-03T01:16:21+5:302020-11-03T01:16:48+5:30

CoronaVirus News in Pune : जिल्ह्यात जुलै महिन्यापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुणे जिल्हा कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनला.

CoronaVirus News: Corona mortality rate drops in Pune, down compared to the state; The positivity rate also went down | CoronaVirus News : पुण्यात कोरोना मृत्युदर घटला, राज्याच्या तुलनेत घसरण; पॉझिटिव्हिटी रेटही झाला कमी

CoronaVirus News : पुण्यात कोरोना मृत्युदर घटला, राज्याच्या तुलनेत घसरण; पॉझिटिव्हिटी रेटही झाला कमी

googlenewsNext

पुणे : पुण्याचा कोरोना मृत्युदर राज्यातील मृत्युदरापेक्षा कमी झाला आहे. राज्याचा मृत्युदर २.६१ टक्के असून पुणे जिल्ह्याचा मृत्युदर २.४३ एवढा आहे. पॉझिटिव्हिटी रेटही आता २२ टक्क्यांपर्यंत कमी झाला असून, कोरोनामुक्तीचा दर जवळपास ९४ टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये सुमारे ५ हजार ६०० तर, घरी सुमारे ६ हजार ४०० रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात जुलै महिन्यापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुणे जिल्हा कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनला. एकूण रुग्णसंख्या, पॉझिटिव्हिटी रेट, मृत्युदर, उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येत राज्यात जिल्हा आघाडीवर होता. पण ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत लक्षणीय घट दिसून आली. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनालाही दिलासा मिळाला. 
मागील १५ दिवसांत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट  २७ टक्के होता, आता हा दर २२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही दोन महिन्यांहून अधिक झाल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसते.
जिल्ह्याचा मृत्यूदर सुरुवातीपासूनच राज्यापेक्षा कमी आहे. मध्यंतरी काही प्रमाणात वाढ झाली होती, पण आरोग्य यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. वेळीच उपचार, घरोघरी जाऊन तपासणी केल्याचा फायदा झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी लोकमतला सांगितले.  

राज्याचा मृत्यूदर     2.61
जिल्ह्याचा मृत्यूदर     2.43
डबलिंग रेट/दिवस    63 दिवस
पॉझिटिव्हिटी रेट    22.75
कोरोनामुक्ती रेट     93.91

Web Title: CoronaVirus News: Corona mortality rate drops in Pune, down compared to the state; The positivity rate also went down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.