Coronavirus _ Masks and handwash products are being sold at high rates, contact us here on pune official | Coronavirus : मेडिकलमध्ये मास्क अन् हॅन्डवॅाशच्या वस्तूंची चढ्या दराने विक्री होतेय, येथे संपर्क साधा

Coronavirus : मेडिकलमध्ये मास्क अन् हॅन्डवॅाशच्या वस्तूंची चढ्या दराने विक्री होतेय, येथे संपर्क साधा

ठळक मुद्देसंपर्क साधावयाची कार्यालये पुढीलप्रमाणे-उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र, पुणे विभाग, पुणे- दुरध्वनी क्र.020-26683176,

पुणे - सध्या कोरोना हा संसर्गजन्य आजार फैलावत असून त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वापरण्यात येणाऱ्या मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश इत्यादी आवेष्टित वस्तुंची कमाल किरकोळ रकमेपेक्षा जादा दराने विक्री होत असल्याचे वृत्त आहे. अशा जादा दराच्या विक्री बाबत तक्रार असल्यास उपनियंत्रक वैधमापनशास्त्र पुणे विभाग, पुणे या कार्यालयाच्या अधिनस्त पाच जिल्ह्यांमधील कार्यालयांमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन पुणे वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक सीमा सु. बैस यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल दुकानदारांकडून ग्राहकांची लुट होत आहे. मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश या वस्तुंची चढ्या दराने विक्री केली जात असून याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मेडिकल दुकानदाराशी वाद न घालता, किंवा त्यांची सक्ती न जुमानता आपण संबंधित सरकारी यंत्रणांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुण्यातील 4 मेडिकल दुकानांना सील ठोकण्यात आल्याची माहिती आहे. या मेडिकल औषध विक्रेत्यांनी सॅनिटायझर, हॅण्डवॉश आणि मास्क यांची चढ्या दराने विक्री केली होती. त्यामुळे, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.    

संपर्क साधावयाची कार्यालये पुढीलप्रमाणे-

उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र, पुणे विभाग,
पुणे- दुरध्वनी क्र.020-26683176,

सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र,
पुणे जिल्हा- दुरध्वनी क्र. 020-26137114,

सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र,
सातारा जिल्हा- दुरध्वनी क्र. 02162-232143,

सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र,
सांगली जिल्हा- दुरध्वनी क्र. 0233-2600053,

सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र,
कोल्हापूर जिल्हा- दुरध्वनी क्र. 0231-2542549,

सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र,
सोलापूर जिल्हा- दुरध्वनी क्र. 0217-2601949 अशी आहेत.

Image may contain: 5 people, people sitting, table and indoor

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus _ Masks and handwash products are being sold at high rates, contact us here on pune official

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.