शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

CoronaVirus News : "रेड झोन वगळता उर्वरित पुणे 3 मे नंतर होणार सुरू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 18:22 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: पुणे शहरामधील "हॉटस्पॉट " परिसर वगळता इतर ठिकाणी सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होणार असल्याचे संकेत पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी एका मुलाखतीत दिले आहे.

पुणे - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहर व जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू होती. त्यात ज्या परिसरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने समोर येत होते ते सर्व परिसर हॉटस्पॉट घोषित करून तेथील निर्बंध आणखी कडक करण्यात आले होते.  मात्र, केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनची मुदत येत्या 3 मे ला संपणार आहे. व त्यानंतर पुणे शहरामधील "हॉटस्पॉट " परिसर वगळता इतर ठिकाणी सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होणार असल्याचे संकेत पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी एका मुलाखतीत दिले आहे.

गेले काही दिवस पोलीस, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. त्यामुळे शहराचा मध्यवर्ती परिसर ,दाटीवाटीच्या वस्ती,  झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत होता. परंतु, त्यामानाने कोथरूड, औंध, बावधन, डेक्कन आदी परिसरात मात्र हे प्रमाण अगदी कमी आहे.तरीदेखील सर्वत्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू होती. मात्र येत्या 4 मे नंतर आता पुणेकरांना दिलासा देणारी बाब म्हणजे हॉटस्पॉट वगळता बाकी शहरातील दुकाने, बाजारपेठा, बांधकाम व्यवसाय, आदी गोष्टी पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव होत असलेल्या केवळ तीस चौरस किलोमीटर भागापुरतेच कडक निर्बंध लागू राहणार असून उर्वरित सर्व पुण्यातील दुकाने, बांधकामे तसेच उद्योग पुन्हा सुरू होणार आहेत. पुणे शहराचे एकूण क्षेत्रफळ हे 330 चौरस किलोमीटर आहे तसेच त्याची  पंधरा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विभागणी केली आहे. त्यापैकी भवानी पेठ, शिवाजीनगर-घोले रस्ता, कसबा पेठ, विश्रामबागवाडा, ढोेलेपाटील रस्ता आणि येरवडा-कळस-धानोरी या भागांत कोरोना बाधित मोठ्या प्रमाणात सापडत असल्याने हे भाग रेड झोनमध्ये आहेत. हा 81 चौरस किलोमीटरचा आहे. या परिसराचा 'मायक्रोक्लस्टर' असा उल्लेख करून उर्वरित सर्व भागांमधील बंधने शिथिल करण्यात येणार आहेत. हा मायक्रो क्लस्टरचा भाग केवळ तीस किलोमीटरचा असल्याने उरलेल्या तीनशे चौरस किलोमीटर क्षेत्रांमधील निर्बंध हटविले जाण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीतले बांधकाम क्षेत्रातील कामे तसेच मेट्रोची कामेही, कृषी विषयक कामे, आदी उद्योगधंदे लवकरच सुरू होणार आहेत. कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पुण्याबाहेरील किंवा इतर राज्यातील जवळपास १८०० कामगारांची व्यवस्था पुण्यातील २९ ठिकाणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परराज्यातील मजुरांविषयीचा निर्णय मात्र येत्या 2 दिवसांनी सरकारच्या आदेशानंतर घेण्यात येईल. अशीही माहिती गायकवाड यांनी यावेळी दिली. 'रेड झोन' परिसर वगळता इतर पुणे शहरातील नागरिकांना दिलासा देणारी गोष्ट म्हणजे 4 मे नंतर बरेच व्यवसाय आणि व्यवहार सुरू होणार आहे. तसेच त्यांना बाहेर पडण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पासची गरज लागणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : देशात 75,000 व्हेंटिलेटर्सची आवश्यकता, कोरोनाग्रस्तांची संख्या 35,043 वर

लवकर उरकून घ्या आर्थिक व्यवहार, मे महिन्यात 12 दिवस बँक बंद राहणार

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना चाचणी करण्यास सांगितले, संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कापले

CoronaVirus News : जगाला कोरोनाचा विळखा! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?

Gas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी खूशखबर! गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर

Zoom अ‍ॅपचा वापर करता?, मग असा ठेवा आपला डेटा सुरक्षित

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेIndiaभारत