CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना चाचणी करण्यास सांगितले, संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कापले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 03:31 PM2020-05-01T15:31:58+5:302020-05-01T15:33:25+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: पत्नीने कोरोना चाचणी करण्यास सांगितले म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

CoronaVirus Marathi News wife asked husband to get corona test he assaulted her SSS | CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना चाचणी करण्यास सांगितले, संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कापले

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना चाचणी करण्यास सांगितले, संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कापले

Next

पटियाला - भारतातही कोरोना आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर मोदी यांनी देशभरात संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. जान है तो जहान है... असं म्हणत नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन मोदींनी जनतेला हात जोडून केले. नाही तर देशाला याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं. कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पत्नीने कोरोना चाचणी करण्यास सांगितले म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबच्या पटियालामध्ये ह विचित्र घटना घडल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारपूर सिंह असं आरोपी पतीचं नाव आहे. तो नोकरी करतो. कामावरून परत आल्यावर भारपूरची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे पत्नीने त्याला तपासणी करण्यास सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारपूर सिंह हा काही दिवसांपासून कामावर होता. त्यानंतर तो घरी परतला असल्याची माहिती त्याच्या पत्नीने दिली. त्याची तब्येत बिघडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आपण त्याला कोरोना चाचणी करण्यास सांगितल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. मात्र पती कोरोना चाचणी करायला तयार नव्हता त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. पुढे वादाचं रुपांतर मारहाणीत झालं आणि रागाच्या भरात पतीने पत्नीचे केस कापले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : जगाला कोरोनाचा विळखा! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?

Gas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी खूशखबर! गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर

Zoom अ‍ॅपचा वापर करता?, मग असा ठेवा आपला डेटा सुरक्षित

CoronaVirus News : दिलासादायक! जगभरात आतापर्यंत दहा लाख रुग्णांची झाली कोरोनातून मुक्तता!

 

Web Title: CoronaVirus Marathi News wife asked husband to get corona test he assaulted her SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.