शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : निरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नृसिंह मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 16:21 IST

निरा नरसिंहपूर : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्याला रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध पावले उचलली असून त्यात मंदिरे ...

ठळक मुद्देकोरोनाची भीतीमुळे लक्ष्मी - नृसिंह मंदिर व अन्नछत्र बंद

निरा नरसिंहपूर : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्याला रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध पावले उचलली असून त्यात मंदिरे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद म्हणून मुंबईच्या सिध्दीविनायक , तुळजाभवानी देवी मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, पंढरपूरचे पांडुरंगाचे मंदिर,शेगावचे गजानन महाराज यांसारख्या अनेक देवस्थानांनी भाविकांना मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच पार्श्वभूमीवर निरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नृसिंह मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. निरा नरसिंहपूर येथे देवस्थानने बैठक आयोजित केली होती. त्यावेळी कोरोनाची भीतीमुळे लक्ष्मी - नृसिंह मंदिर व अन्नछत्र बंद करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. भक्तांना देण्यात येणाऱ्या खोल्याही बंद ठेवण्यात आल्या आहेत.तसेच मंदिरातील धार्मिक विधी (देवाची पूजा सोडून ) बंद ठेवण्यात आले आहेत,अशी  माहिती मंदिराचे जनसंपर्क अधिकारी नारायण दंडवते यांनी दिली. नीरा नरसिंहपूर येथील चैतन्य विद्यालय व सुधाकर गोविंद दंडवते कनिष्ठमहाविद्यालय, शिवपार्वती इंग्लिश मिडियम स्कूल, माध्यमिक विद्यालय गिरवी,लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालय पिंपरी बुद्रुक तसेच सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना  दिनांक १६ ते ३१ मार्च दरम्यान शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी घेतला आहे.तर नीरा नरसिंहपूर, पिंपरी बुद्रुक येथील दोन आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवकांनी घेतला आहे.रस्त्यावर शुकशुकाट जाणवत असून व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे दिसतआहे. त्यामुळे स्वयंघोषित संचारबंदी लागू झाल्याचे चित्र सर्वत्र दिसूनयेत आहे.

टॅग्स :IndapurइंदापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTempleमंदिर