शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : सोशल मीडियावर कोरोनाविषयी अफवा पसरविणारे मेसेज पाठवू नका : गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 18:49 IST

कोरोना विषाणू इतर विषाणूंच्या तुलनेत झपाट्याने पसरत असल्याने योग्य ती काळजी घेणे गरजेचे

ठळक मुद्दे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी.

पुणे : कोरोनाविषयी अफवा, गैरसमज पसरविणारे, भीती उत्पन्न करणारे संदेश सोशल मीडियावर पाठवू नयेत. काही लोकांना संशयित म्हणून ताब्यात घेतले असून त्यांच्यावर डॉक्टरांकडून तातडीने उपचार सुरु आहेत. नागरिकांनी त्यांच्या प्रयत्नांना बाधा येईल अशाप्रकारची कोणतीही कृती नरु नयेत. तसेच सर्व नागरिकांनी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. कोरोना संसर्गजन्य असल्याने खोकताना, शिंकताना नाका- तोंडावर रुमाल ठेवावा, हात वारंवार धुवावा, असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले आहे.

चीनसह जगातील विविघ देशात थैमान घालणाऱ्या 'कोरोना' विषाणू भारतात धडकला असून त्याचे काही संशयित पुण्यासह कर्नाटक , केरळ, मध्ये सापडले आहे. दुबईहून पुण्यात आलेल्या एका दांपत्यासह त्यांच्या मुलीला व एका ओला चालकाला या कोरोनाची लागण झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वरे कोरोनाविषयी काळजी घेण्याचे आवाहन केले. गंभीर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असेही बापट यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. .बापट म्हणाले, पुण्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा व महापालिका प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असून त्यांच्याकडून वेळोवेळी तयारीचा आढावा घेत असल्याचे स्पष्ट केले. तसेच कोरोना विषाणू  इतर विषाणूंच्या तुलनेत झपाट्याने पसरत असल्याने नागरिकांनी याबाबत योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. हा आजार योग्य दक्षतेने व वेळीच उपचार केल्यामुळे बरा होवू शकतो. जगभरात या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने सांगितलेल्या उपाय योजनांचा अवलंब केला पाहिजे. बाधित रुग्णांना नायडू हॉस्पिटल, पुणे येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. याशिवाय महापालिकेकडून आणखी दोन विलगीकरण कक्ष तयार करण्यात येत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgirish bapatगिरीष बापटSocial Mediaसोशल मीडियाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका