शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

Coronavirus : कोरोना विषाणूचा उद्रेक रोखण्यासाठी सध्या डॉक्टरच ‘फ्रंटफूट’वर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 23:30 IST

सर्वच डॉक्टर, नर्स, डॉक्टरेतर कर्मचारी रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास कार्यतत्पर

ठळक मुद्देराज्यभरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा तातडीने कामालाराज्यभरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा तातडीने कामालासरकारी आणि खासगी वैद्यकीय यंत्रणेत संवाद हवा

पुणे : कोरोना विषाणूचा उद्रेक होऊ नये यासाठी राज्यभर गर्दी टाळण्याचे, व्यवसाय बंद ठेवण्याचे, खासगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा देण्याचे आदेश लागू झाले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी घरीच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डॉक्टर आणि वैैद्यकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी मात्र ‘फ्रंटफूट’वर तत्परतेने कार्यरत आहेत. राज्यभरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे. सरकारी रुग्णालयांप्रमाणेच सर्वच डॉक्टर, नर्स, डॉक्टरेतर कर्मचारी रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास कार्यतत्पर राहताना दिसत आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सर्व प्रकारची खबरदारी घेऊन वैैद्यकीय क्षेत्राचा कोरोनाविरुद्धचा लढा सुुरु आहे. यानिमित्ताने तरी समाजातील डॉक्टरांबद्दलचे नकारात्मक वातावरण कमी व्हावे आणि त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी, अशी अपेक्षा वैैद्यकीय क्षेत्रामधून व्यक्त होत आहे.अनेकदा रुग्णाचे हॉस्पिटलमध्ये निधन, उपचारावरील अविश्वास यामुळे नातेवाईक संतप्त होतात. यातूनच रुग्णालयांमध्ये तोडफोड केल्याच्या, डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटना घडतात. अशा घटनांमुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत जाते. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या निमित्ताने डॉक्टरांची कार्यतत्परता अधोरेखित होत आहे. त्यामुळे समाजामधील त्यांच्याबद्दलचा आकस कमी व्हावा, अशा स्वरुपाचे आवाहन करण्यात येत आहे.---------कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्स, इतर कर्मचारी आपापल्या प्रोटोकॉलप्रमाणे चांगले काम करत आहेत. अशा परिस्थितीत सर्व पदाधिकारी, तसेच नागरिकांनी वैैद्यकीय क्षेत्राला सहकार्य करण्याची गरज आहे. एखादी दुर्दैवी घटना घडली की डॉक्टरांवर हल्ले होतात. त्याबाबत आता कायदाही मंजूर झाला आहे. मात्र, सामान्यांनी थेट डॉक्टरांव हल्ले न चढवता परिस्थितीची खातरजमा करावी. सध्या सर्वच स्तरांवर शासकीय यंत्रणा कोरोनाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे.- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, पुणे महानगरपालिका------------आयएमएच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत. सामान्यांच्या प्रश्नांना उत्तरे, अफवाविरोधी मोहीम असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. कोणताही साथीचा रोग आला की त्याचा सामना करण्यासाठी डॉक्टर अहोरात्र झटत असतात. त्यांच्या कामाची समाजाकडून दखल घेतली जाणे अपेक्षित आहे. - डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, आयएमए------------सरकारी आणि खासगी वैद्यकीय यंत्रणेत संवाद हवाकोरोनाबाबतचे शासनाचे धोरण, त्यांच्याकडून देण्यात येणारे आदेश याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाकडून खासगी डॉक्टरांशी कोणताही संवाद साधण्यात आलेला नाही. खासगी डॉक्टर शासनाला पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहेत. पुढील काही काळामध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे, पुढील दोन-तीन दिवसांमध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार असल्याचे डॉ. भोंडवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलState Governmentराज्य सरकार