coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला, पुण्यात शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद, रात्री लागू राहणार संचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 11:31 AM2021-02-21T11:31:24+5:302021-02-21T12:56:40+5:30

Coronavirus infection increases In Pune : पुणे महानगरपालिका क्षेत्रासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

coronavirus: Coronavirus infection increases, schools closed in Pune till February 28, curfew will remain in effect at night | coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला, पुण्यात शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद, रात्री लागू राहणार संचारबंदी

coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला, पुण्यात शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद, रात्री लागू राहणार संचारबंदी

Next

- लक्ष्मण मोरे 

पुणे - राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अचानक वाढल्याने सरकार आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले असून, (Coronavirus infection increases in Pune)पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे सहावाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. (schools closed in Pune till February 28, curfew will remain in effect at night)

दरम्यान, पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, शहरात रात्री ११ ते पहाटे सहादरम्यान संचारबंदी लागू राहील. पुण्यामध्ये हॉटेल सुरू ठेवण्यासाठी रात्री ११ पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. 

शहरातील कोचिंग क्लासेस बंद राहतील. मात्र अभ्यासिका सुरू राहतील. तसेच महाविद्यालयेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच लग्नसोहळ्यासाठी केवळ २०० जणांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.  

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत सांगितले की, सध्या एनआयव्हीमध्ये चाचण्या बंद आहेत. जीनोम सिक्वेन्सींग सुरू असल्याने चाचण्या बंद आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागांत कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. लग्न तसेच खासगी, राजकीय ,कार्यक्रमांवर निर्बंध. २०० लोकांच्या उपस्थितीस परवानगी असेल. 
 
ससुन रुग्णालयामध्ये कोरोना चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत. उद्या हॉटेल असोसिएशनबरोबर बैठक होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांच्या परवानगीशिवाय कार्यक्रम घेता येणार नाहीत. लग्नासाठी पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असेल. पोलिसांना २ तासांत परवानगी द्यावी लागणार आहे. तसेच संचारबंदी लागू न करता नियंत्रित संचारावर भर दिला जाईल. या नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे. 

दरम्यान पुणे शहर, जिल्हा आणि आसपासच्या भागातील कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. ज्या। भागात रुग्ण अधिक वाढत आहेत, अशा 'हॉटस्पॉट' प्रभावी नियोजन करून आवश्यकता भासल्यास पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रे (Containment Zone) निर्माण करावेत अशा सूचना पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आज झालेल्या बैठकीत केल्या. 

 आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघर भेटी देऊन सुपर स्प्रेडर, आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या ताप सदृश्य रुग्णांची स्वाब तपासणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपर्क शोध मोहीम (Contact Tracing) अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना पवार यांनी केल्या. यासोबतच सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पवार यांनी बैठकीमध्ये केले.

Web Title: coronavirus: Coronavirus infection increases, schools closed in Pune till February 28, curfew will remain in effect at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.