शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : तबलिगी जमातशी संबंधित ८ टान्झानियाच्या नागरिकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 18:52 IST

तबलिगी जमातशी संबंधित असलेल्या 8 टान्सानियाच्या नागरिकांवर साथीचा राेग कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तसेच परकीय नागरिक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : तबलिगी जमातशी संबंधित पुण्यातील विविध मशिदीमध्ये राहणार्‍या ८ टान्झानियाच्या नागरिकांवर कोरोना संबंधीत साथीच्या रोगाचा कायद्याचा भंगकेला तसेच परकीय नागरिक कायद्याचा भंग केल्याखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच टुरिस्ट व्हिसावर येऊन धार्मिक प्रचार करत करुन त्यांनी व्हिसा कायद्याचा भंग केला आहे.

पुण्यातील कोंढवा, कासेवाडी, मोमीनपुरा, घोरपडी, हडपसर खडकी येथील मश्जिदमध्ये त्यांचे वास्तव होते. ते पुण्यात ११ मार्च २०२० पासून आले होते. त्यांनी स्वत: ला क्वारंटाईन करुन घेणे अपेक्षित असताना त्यांनी तसे केले नाही. तसेच लॉकडाऊनचे उल्लंघन केले आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकज मध्ये उपस्थित राहिलेल्यांपैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याचे समजल्यावर पुणेपोलिसांनी शोध सुरु केला होता. त्यात तबलिगी जमातशी संबंधित हे टान्झानियाचे नागरिक पुण्यातील विविध मशिद व मदरशांमध्ये रहात असल्याचे आढळून आले. कोविड १९ या साथीच्या रोगाच्या संदर्भात शासनाने पारित केलेल्या लॉक डाऊनच्या विविध आदेशांचे त्यांनी उल्लंघन केले आहे.

याप्रकरणी विशेष शाखेचे पोलीस नाईक मयुर सूर्यवंशी यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध  कलम १८८ तसेच २६९, २७०, परकीय नागरिक कायदा १४, साथीचा रोग प्रतिबंध कायदा १८९७, महाराष्ट्र कोवीड १९ अंमलबजावणी कायदा कलम २१ नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, टान्झानियाचे नागरिक असलेले हे ८ जण ११ मार्च रोजी पुण्यात टुरिस्ट व्हिसावर आले होते. शहरातील विविध मश्जिदीमध्ये राहत असल्याचे आपल्याला २३ मार्च रोजी समजले होते. त्यानंतर आपण त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कोरोना चाचणी घेतली होती. त्यांना होम क्वारंटाईन रहायला सांगितले होते. चौकशी दरम्यान, ते टुरिस्ट व्हिसावर आल्याचे व त्यादरम्यान ते धार्मिक प्रचार करीत असल्याचे आढळून आले. टुरिस्ट व्हिसानुसार हा परकीय नागरिक कायद्याचा भंग असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी साथीचा रोग कायद्याचाही भंग केला आहे. सध्या ते आरोपी असून त्यांना इन्स्टिट्युटशन क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेPoliceपोलिस